Home विदर्भ सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,गडचिरोली यांचे आवाहन।

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,गडचिरोली यांचे आवाहन।

185
0

राजेंद्र पाटील राऊत

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण ,गडचिरोली यांचे आवाहन।
गडचिरोली(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहीती इतर मागास वर्ग, सामाजीक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती,भटक्या जमातीच्या समाजातील तळागाळातील,अशिक्षीत तसेच ग्रामीण भागातील शेवटच्या घटका पर्यत पुरेशी माहीती पोचत नसल्याने समाजातील नागरीक अपेक्षीत लाभापासुन वंचित राहू नये व संबंधितांना योजनेची माहीती मिळावी या करीता समाज कल्याण विभाच्या कार्यालयाद्वारे ग्रामीण व शहरी भागातील इमाव विमाप्र तसेच विजाभज प्रवर्गातील घंटकांनसाठी पुढिल प्रमाणे विविध योजना राबविण्यात येतात सदर योजनेच्या सदर माहितीसाठी व योजनेच्या शासन निर्णयासाठी https://www.maharashtra.gov.in/1145/Government Resolutions या संकेतस्थंळावर भेट द्यावी किव्हा कार्यालय,सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण आयुक्त गडचिरोली येथे संपर्क करावे असे आवाहण करण्यात आले आहे.सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,या कार्यालयाद्वारे राबविण्यात येणार्या विविध योजनाची नावे पुढिल प्रमाणे आहेत विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग .
Maha DBT पोटल- भारत सरकार मॉट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना,शिक्षण शुल्क,परिक्षा शुल्क, (फ्रिशिप) योजना,वस्तीगृह योजना,(विमुक्त जाती भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग ), वंसतराव नाईक तांडा / वस्ती सुधार योजना ,वंसतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना,धनगर समाज बांधवांच्या विकासासाठी विविध योजना मध्ये (भटक्या जमाती प्रवर्ग), अ) केंद्राच्या स्टैड अप इंडिया योजने अंतर्गत धनगर समाजातील महीलांकरीता मनी माजिन योजना , ब) धनगर समाजाच्या विध्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यंमाच्या नामांकीत निवासी शांळामध्ये शिक्षण,क)धनगर समाजाच्या विध्यार्थ्यांसाठी स्वंयम योजना,ड)धनगर समाजासाठी घरे बांधण्याची योजणा,विजाभज प्रवर्गातील मुलांनकरीता आश्रम शाळा,कन्यादान योजना वरील योजनांच्या संबंधाने अधिक माहितीसाठी साहाय्यक आयुक्त ,समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे साहाय्यक आयुक्त समाज कल्याण गडचिरोली यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here