• Home
  • पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210322-WA0061.jpg

पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बँकाना बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आवाहन

(वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
पालघर दि. २३ :वित्तीय वर्ष २०२०-२०२१ अखेर कोषागार तसेच अधिनस्त उपकोषागारावर आहरण संवितरण अधिकारी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या शासकीय अनुदाना संदर्भात व शासकिय मागण्या दि.३१ मार्च २०२१ रोजी पुर्ण होवुन त्यांचे प्रदान होणे आवश्यक आहे.

दिनांक ३१ मार्च २०२१ हा वित्तिय वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने कोषागार व उपकोषागार कार्यालयाच्या काऊंटरवर ( गणनाफलकावर ) सादर होणारी सर्व प्रकारची देयके स्विकारुन ती नियमानुसार पारित करणे आवश्यक असल्याने त्यांचे धनादेश / ईएफटी / सीएमपी त्याच दिवशी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना निर्गमित करणे आवश्यक आहेत. तसेच या दिवशी शासकिय व्यवहार वाढण्याची शक्यता असल्यामुळे संबंधित बँकांची नियमित कामकाजाची वेळ वाढविणे अपरिहार्य आहे. महाराष्ट्र कोषागार नियम १९६८ मधील नियम ४०९ मध्ये जिल्हाधिकारी यांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार पालघर जिल्ह्यातील शासकीय व्यवहार हाताळणाऱ्या बॅका बुधवार दि. ३१ मार्च २०२१ रोजी रात्री उशिरापर्यंत चालू ठेवून शासकीय प्रदानाची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. सदर दिवशी पालघर जिल्ह्यामधील कोषागार / उपकोषागार कार्यालयांशी प्रत्यक्ष समन्वय साधुन शासकीय व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतरच बँका बंद करण्याची कार्यवाही करावी.

anews Banner

Leave A Comment