Home पश्चिम महाराष्ट्र स्मशानभूमी पार्किंग काँक्रिटीकरण शुभारंभ

स्मशानभूमी पार्किंग काँक्रिटीकरण शुभारंभ

114
0

राजेंद्र पाटील राऊत

स्मशानभूमी पार्किंग काँक्रिटीकरण शुभारंभ
इचलकरंजी:
इचलकरंजी नागरिक मंचची प्रलंबित मागणी असलेल्या स्मशानभूमी पार्किंगच्या अंतिम टप्प्यातील काँक्रिटीकरण कामास आज नगराध्यक्षा अलका स्वामी,व राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य नगरसेवक मदन कारंडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. वेळोवेळी पाठपुरावा करूनही सहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या कामाबाबत दोन महिन्यापूर्वी इनामने रास्ता रोकोचा इशारा दिला होता.त्यानंतर बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नगरसेवक मदन कारंडे यांच्या सूचनेनुसार तातडीची बैठक घेऊन काम मार्गी लावणे बाबत उपाययोजना केल्या होत्या.
सदर कामाच्या मुरुमीकरण व इचिंग नंतर काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील, इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील,अमित बियाणी,राजू कोंनूर, उदयसिंह निंबाळकर,अभिजीत पटवा मक्तेदार बाळू तेजी,संभाजी सूर्यवंशी,नितीन कोकणे उपस्थित होते.सदर काम पूर्णत्वास जाण्यासाठी माजी आमदार सुरेश हाळवणकर, विद्यमान आमदार प्रकाशआण्णा आवाडे,माजी बांधकाम समिती सभापती किरण खवरे,माजी नगर अभियंता बापूसाहेब चौधरी, नगरअभियंता संजय बागडे,इंजिनिअर राधिका हावळ यांचे सहकार्य लाभले   (युवा मराठा न्युज नेटवर्क)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here