Home माझं गाव माझं गा-हाणं जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई...

जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई चे आदेश

214
0

राजेंद्र पाटील राऊत

जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई चे आदेश  (वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)

पालघर दि. २३ :- राज्यात व जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणुचा (कोविड-१९) संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. तसेच जिल्हयामध्ये कोरोना विषाणूचा (कोविड-१९) संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेले आहेत. सदर संसर्ग पसरत असल्याची बाब विचारात घेता, जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई करणे आवश्यक आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व महाराष्ट्र कोव्हिड १९ उपाययोजना नियम, २०२० चा नियम १० नुसार पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये पालघर जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट व सार्वजनिक सभागृहे येथे धुलीवंदन कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे.

सदरहू आदेशाचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील ५१(b), भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ व साथ रोग नियंत्रण अधिनियम १८९७ नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here