Home विदर्भ शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची गडचिरोली...

शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची गडचिरोली येथे अधिकाऱ्यांना सूचनागडचिरोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतली अधिकाऱ्यांची बैठक

85
0

राजेंद्र पाटील राऊत

शासन निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावाआमदार डॉक्टर देवरावजी होळी यांची गडचिरोली येथे अधिकाऱ्यांना सूचनागडचिरोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेतली अधिकाऱ्यांची बैठक

अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयाचा अभाव असल्याने शासन निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मागील सत्तारूढ भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात घरकुलांना मोफत ५ ब्रास रेती देणे ,गावठाणचे सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड वितरित करणे, शेतकऱ्यांचे खातेफोड करणे यासारख्या सर्वसामान्य माणसांच्या हिताच्या दृष्टीने अनेक शासन निर्णय घेतले परंतु अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी त्या शासन निर्णयांची योग्यप्रकारे अंमलबजावणी होत नाही त्यामुळे या शासन निर्णयाची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी आपण अधिकाऱ्यांनी पुढाकर घ्यावा अशी सूचना गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले.
या बैठकीला उपविभागीय अधिकारी येरेकर सर, नायब तहसीलदार हेमंत मोहरे, गडचिरोलीचे संवर्ग विकास अधिकारी मोहोर साहेब , भुमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते

तत्कालीन भाजपा सरकारने महाराष्ट्र गौण खनिज कायद्यात सुधारणा करून घरकुल धारकांना ५ ब्रास मोफत रेती देण्याचा शासन जी.आर. २०१८-१९ मध्ये काढलेला आहे. परंतु जिल्ह्यात अजूनही त्या शासन निर्णयाचा घरकुल धारकांना लाभ होऊ शकला नाही.
गावठाण मोजणी करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड करण्यात यावे यासाठी शासनाने जी.आर. काढून प्रॉपर्टी कार्ड बनवण्याचे निर्देश दिले. परंतु अधिकाऱ्यांच्या समन्वयाअभावी त्याही कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे खातेफोड करताना शेतकऱ्यांना न्याय मिळावा याकरिता खातेफोड करण्यासंदर्भात शासन निर्णय घेण्यात आला परंतु मागील ५ वर्षांपासून एकाही शेतकऱ्याचे खातेफोड करण्यात आले नाही. यासारखे अनेक जनसामान्यांचे जनसामान्यांच्या हिताचे निर्णय भाजपा सरकारने घेतले परंतु त्या शासन निर्णयांची योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नसल्यामुळे त्या शासन निर्णयांचा योग्य लाभ सर्वसामान्य लोकांना होत नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. त्यामुळे या शासन निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी व्हावी यासाठी किमान अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना या बैठकीत आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here