Home जळगाव दहिवद शिवारात गळफास घेवून एकाची आत्महत्या

दहिवद शिवारात गळफास घेवून एकाची आत्महत्या

91
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231006-070606_Google.jpg

दहिवद शिवारात गळफास घेवून एकाची आत्महत्या
चाळीसगाव प्रतिनिधी विजय  पाटील – चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्यावरील दहिवद शिवारातील शेतात अंदाजे 49 वर्षीय अनोळखी पुरुषाने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास उघडकीस आली आहे. या इसमाची अद्यापही ओळख पटून आली नसल्याने मेहूणबारे पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.
दहिवद शिवारातील चिंचगव्हाण फाट्याजवळ आलेल्या शेतात निंबाच्या झाडाच्या फांदीला दोरीने बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला.गळफास घेतलेल्या अनोळखी व्यक्तीबाबत मेहूणबारे पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
आत्महत्या करणारा अनोळखी चिंचगव्हाण परिसरातील नसल्याची खात्री झाली असून त्याची ओळख पटविण्याचे आवाहन मेहूणबारे पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक विष्णू आव्हाड व उपनिरीक्षक गोपाल पाटील यांनी केले आहे.

Previous articleविक्रमशीला तंत्रनिकेतन, दारापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती,येथे रविवार दिनांक 01आक्टोबर 2023 रोजी श्रमदान दिन (स्वच्छता दिन )संपन्न
Next articleबैल उधळला जावून फेकला गेल्याने जुनोने येथील शेतकऱ्याचा मृत्यु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here