Home जळगाव बैल उधळला जावून फेकला गेल्याने जुनोने येथील शेतकऱ्याचा मृत्यु

बैल उधळला जावून फेकला गेल्याने जुनोने येथील शेतकऱ्याचा मृत्यु

96
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231006-070540_Google.jpg

बैल उधळला जावून फेकला गेल्याने जुनोने येथील शेतकऱ्याचा मृत्यु
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – तालुक्यातील जुनोने येथील शेतकरी बैलजोडी घरी नेत असताना समोरून आलेल्या बैलांच्या झटापटीत बैलांचे दोर हाताला गुंडाळल्याने शेतकरी ओढला जावून रस्त्यावर डोक्यावर आदळला जावून दि 4 रोजी शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यु झाला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
नामदेव जयसिंग राठोड(65)हे दि 5 रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास शेतातून त्यांचे दोन्ही बैले घरी घेवून जात असतांना बैलांचे दोर त्यांच्या हाताला गुंडाळले होते गावात आल्यावर समोरून काही बैल आल्यावर त्यांचे बैल उधळले त्या झटक्यात नामदेव जयसिंग राठोड हे सिमेंटच्या रस्त्यावर डोक्यावर आदळून जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार भगवान माळी करीत आहेत.

Previous articleदहिवद शिवारात गळफास घेवून एकाची आत्महत्या
Next articleविद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध डॉ. शुभांगिताई पूर्णपात्रे…..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here