Home जळगाव विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध डॉ. शुभांगिताई पूर्णपात्रे…..

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध डॉ. शुभांगिताई पूर्णपात्रे…..

138

आशाताई बच्छाव

IMG-20231005-WA0058.jpg

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध डॉ. शुभांगिताई पूर्णपात्रे…..

चाळीसगाव,प्रतिनिधी विजय पाटील – डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालय चाळीसगाव येथे दि. 4/10/ 23रोजी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव  डॉ. सौ. शुभांगीताई पूर्णपात्रे यांच्या अध्यक्षतेखाली माता – पालक संघची सभा संपन्न झाली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालरोग तज्ज्ञ डॉ. सौ. पल्लवी पाटील उपस्थित होत्या. मंचावर मुख्याध्यापक  रमेश सोनवणे, माता – पालक संघच्या उपाध्यक्षा सौ. सोनाली नरेंद्र पाटील व शिक्षक  राजेंद्र वराडे उपस्थित होते.  प्रास्ताविक मांडताना मुख्याध्यापक रमेश सोनवणे यांनी केले. यावेळी माता – पालक संघच्या उपाध्यक्षा पदी सोनाली पाटील यांची निवड करण्यात आली. अध्यक्षीय मनोगतात डॉ. सौ. शुभांगीताई पूर्णपात्रे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण भूमिका असलेल्या  माता- पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी 11 सप्टेंबर रोजी शाळेत आयोजित आजी – आजोबा दिवस निमित्ताने मनोरंजक खेळ संगीतखुर्चीत विजेत्या आजी – आजोबांना मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.  सूत्रसंचालन लता निकम यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांचा परिचय वैशाली पाटील मॅडम यांनी केला, आजी-आजोबा संगीतखुर्ची विजेत्यांचे यादी वाचन रेणुका साळुंखे यांनी केले  आभार  मनिषा पाटील यांनी मानले.

Previous articleबैल उधळला जावून फेकला गेल्याने जुनोने येथील शेतकऱ्याचा मृत्यु
Next articleपोलीसच त्यांचे हक्क मागण्यात अपयशी ठरले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.