Home Breaking News पत्रकार दिनानिमित युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत यांचा सत्कार

पत्रकार दिनानिमित युवा मराठाचे राजेंद्र पाटील राऊत यांचा सत्कार

107
0

पत्रकार दिनानिमित युवा मराठाचे
राजेंद्र पाटील राऊत यांचा सत्कार
उतर महाराष्ट्र अध्यक्षपदी सार्थ निवड
किरण अहिरराव प्रतिनिधी
उमराणे ,युवा मराठा न्युज नेटवर्क– अगदी खेडेगावापासून आपल्या पत्रकारितेची सुरुवात करुन स्वकर्तृत्वावर संपूर्ण महाराष्ट्राभर नावलौकिक करणाऱ्या आणि निर्भिड पत्रकारितेचा वारसा जोपासणा-या युवा मराठा न्युजपेपर्स अँन्ड न्युज चँनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत यांचा आज पत्रकार दिनाचे औचित्य साधून भारतीय मराठा महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.अप्पासाहेब आहेर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांच्या निर्भिड
पत्रकारितेतील कार्याचा गौरव करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन सौंदाणे, ता.मालेगांव येथील दतमंदीर ब्रम्हविद्या सेवाश्रम या ठिकाणी करण्यात आले होते.सदर कार्यक्रमास युवा मराठाचे सहसंपादक पंकज गायकवाड प्रतिनिधी विशाल बच्छाव तन्मय अमृते,आंशूराज पाटील व सौंदाणे परिसरातील ग्रामस्थ बहुसंख्येने हजर होते.
तर याप्रसंगी राजेंद्र पाटील राऊत यांची भारतीय मराठा महासंघाच्या उतर महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डाँ.आप्पासाहेब आहेर यांनी करुन तसे नियुक्ती पत्र राजेंद्र पाटील राऊत यांना बहाल केले.
या निवडीचे अनेकांनी स्वागत केले असून,पत्रकार राजेंद्र पाटील राऊत यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

Previous articleग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत
Next articleरायगड जिल्ह्यात नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थ्यानीवर बलात्कार सर्वत्र तीव्र संताप….!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here