• Home
  • ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210106-WA0069.jpg

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा ! राज्यात अनेक गावांचा इतिहास मोडीत
युवा मराठा न्यूज नेटवर्क पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप.
मुंबई: कोरोना महामारीमुळे लांबलेल्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या अन् गावागावात निवडणुकांचा धुरळा उडू लागला आहे . लॉकडाऊनमुळे निपचित पडलेल्या खेड्यापाड्यात आता जल्लोष दिसत आहे . यंदाची निवडणूक अनेक दृष्टीने महत्वाची आहे . लोकप्रतिनिधींच्या आवाहनानंतर अनेक गावांमध्ये वाद – विवाद विसरून गावाच्या विकासासाठी विरोधक एकत्र आले . तर अनेक वर्षांपासून बिनविरोध होणाऱ्या गावांमध्ये निवडणूक लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे . राज्यातील अशाच काही ग्रामपंचायतींचा आढावा .तब्बल 45 वर्षे बिनविरोध असलेल्या बार्शी तालुक्यातील मळेगाव येथे यंदा मात्र निवडणुका लागल्या आहेत . शेवटच्या दिवशी देखील अर्ज माघारी न घेतल्याने सर्व तिन्ही प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडेल . तिन्ही प्रभागातून 9 उमेदवार ग्रामस्थांना निवडून द्यायचे आहेत . ज्यासाठी 22 उमेदवार रिंगणात उतरणार आहेत . बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये तब्बल 9 निवडणुका बिनविरोध करून सलग 50 वर्षे बिनविरोध राहण्याचा प्रयत्न यंदाच्या निवडणुकात होता . मात्र , अर्ज कायम राहिल्याने बिनविरोध उमरगा तालुक्यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत बिनविरोध उस्मानाबाद जिल्ह्यातील 428 पैकी 40 ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली असून यात सर्वाधिक 10 ग्रामपंचायत उमरगा तालुक्यातील आहेत तर कळंब , परंडा , लोहारा या तालुक्यात प्रत्येकी 5 , उस्मानाबाद तालुका 3 , तुळजापूर 4 , भूम तालुका 7 व वाशी तालुक्यातील 1 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी सचिन गिरी यांनी दिली .

anews Banner

Leave A Comment