Home Breaking News 🛑 लॉकडाऊन काळात पुण्यात ‘यांना’ राहणार सशर्त मुभा 🛑 ✍️पुणे :( विलास...

🛑 लॉकडाऊन काळात पुण्यात ‘यांना’ राहणार सशर्त मुभा 🛑 ✍️पुणे :( विलास पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

117
0

🛑 लॉकडाऊन काळात पुण्यात ‘यांना’ राहणार सशर्त मुभा 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे:⭕ वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शहरात मंगळवारी पहाटे 1 वाजेपासून पुन्हा लॉकडाऊन होणार आहे. यात काही सेवा सुरू राहणार आहेत. मात्र त्यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. या सेवा पुढीलप्रमाणे

*घरपोच दूध वितरण व विक्री सुरूच राहणार

*सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सालय नियमित वेळेनुसार सुरू

* सर्व रुग्णालये, संबंधित सेवा आस्थापना त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू

*न्यायालये तसेच राज्य/ केंद्र शासनाचे कार्यालये, शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये 10 टक्के कर्मचारी मर्यादित कर्मचारी वर्गासह सुरू राहतील.

*शासकीय पेट्रोलपंप आणि कंपनी संचलित पेट्रोलपंप सकाळी 9 ते दुपारी 2 वेळेतच सुरू राहणार. अत्यावश्‍यक सेवांना पेट्रोल देणे बंधनकारक

*एलपीजी गॅस सेवा घरपोच. गॅस वितरण नियमानुसार राहील.

*निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक शासन नियमानुसार सुरू राहील.
वर्तमानपत्रे प्रिंटीग आणि वितरण, प्रिंट मीडिया/डिजिटल मीडियाची कार्यालये शासकीय नियमानुसार सुरू राहतील.वृतपत्र वितरण सकाळी 6 ते 9 पर्यंत करता येईल.

* पाणीपुरवठा करणारे टॅंकर

* संस्थात्मक अलगीकरण/ विलगीकरण आणि कोविड केअर सेंटरसाठी महानगरपालिकेने ताब्यात घेतलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमांनुसार सुरू राहती.

* कोणत्याही व्यक्‍तीस अत्यावश्‍यक कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.

* सर्व राष्ट्रीयीकृत आणि आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंका नियमानुसार सुरू राहतील. परंतु कोणतेही ग्राहक बॅंकेत जाणार नाही. बॅंकांची इतर ग्राहकसेवा जसे ऑनलाइन, घरपोच कॅश डिलिव्हरी सेवा, बॅंकेची एटीएम सेवा सुरू राहील.

*  माहिती तंत्रज्ञान उद्योग कंपन्या 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील

* कृषी निगडीत प्रक्रिया उद्योग सुरू राहतील

* जीवनावश्‍यक व औषधांचे वाटप सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत करता येईल. त्यासाठी पोलीस पास आवश्‍यक

* एमआयडीसी व खासगी जागेवरील उद्योग सुरू राहणार असून, कामगार वाहतुकीसाठी पोलीस पास घ्यावा लागेल

* वृद्ध व आजारी व्यक्तींच्या मदतनीसांच्या सेवा सुरू राहतील

* उद्योग क्षेत्रात जाण्यासाठी कंपनीचे ओळखपत्र बंधनकारक

⭕ *यांना वापरता येतील दुचाकी आणि चारचाकी वाहने*⭕

पुणे महापालिका हद्दीतील न्यायालयाचे कर्मचारी, अधिकारी, न्यायाधीश, वकील, राज्य-केंद्र शासनाचे कर्मचारी, शासन अंगिकृत कर्मचारी, डॉक्‍टर-नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्रे, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबंधित मेडिकल शॉपचे कर्मचारी, दूध विक्रेते, कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक, पाणी पुरवठा व स्वच्छता, अग्निशमन, जलनि:सारण तसेच पूर्व पावसाळी आणि पावसाळ्यादरम्यान करावयाची अत्यावश्‍यक कामे करणारे, वित्त, वितरण कंपनी कर्मचारी, महानगरपालिका-पोलीस-महसूल कर्मचारी तसेच कन्टेमेंट झोनसाठी नियुक्त कर्मचारी यांनाच चारचाकी, दुचाकी (फक्‍त स्वतःसाठी) वाहन वापरण्यास परवानागी असेल.

या सर्व व्यक्‍तींनी स्वतःच्या कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीस कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहनाचे आवश्‍यक परवाने सोबत ठेवावे. या सर्वांना वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा त्यांचे कामाच्या जबाबदारीनुसार आणि शासकीय अथवा त्यांच्या संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.

⭕दि. 18 जुलैनंतर काय ?⭕

19 जुलै पासून केवळ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने (किराणा माल, ठोक विक्रेते) सुरू राहतील, त्यासाठी सकाळी 8 ते दुपारी 12 ही वेळ असेल. इतर सर्व प्रकारची दुकाने बंद राहतील. तर चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने 18 जुलैपर्यंत बंद राहणार असून, दि.19 ते 23 जुलै या कालावधीत सकाळी 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ही दुकाने उघडतील. याशिवाय, ई कॉमर्स सुविधा 19 जुलैपासून पुन्हा सुरू होतील….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here