Home Breaking News 🛑 बजाज कंपनीच्या १४ कामगारांचा मृत्यू …! ‘या’ शहरात आजपासून कडकडीत लॉकडाऊन...

🛑 बजाज कंपनीच्या १४ कामगारांचा मृत्यू …! ‘या’ शहरात आजपासून कडकडीत लॉकडाऊन 🛑 ✍️औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

134
0

🛑 बजाज कंपनीच्या १४ कामगारांचा मृत्यू …! ‘या’ शहरात आजपासून कडकडीत लॉकडाऊन 🛑
✍️औरंगाबाद:( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

औरंगाबाद (संभाजीनगर):⭕ येथील बजाज कंपनी ही कोरोनाचा नवा हॉटस्पॉट ठरली आहे. औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी येथे हि बजाज कंपनी आहे. या कंपनीमधील कामगार व त्यांचे नातेवाईक अशा ३०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
औरंगाबाद मध्ये काल कोरोना बधितांचा आकडा हा ७६४६ वर गेला असून आज ३०८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मागील आठवड्यापासून कोरोना बाधितांचा आकडा हा नवनवे उच्चांक गाठत असून आज (दि. १० जुलै) पासून औरंगाबाद शहरासह वाळूज एमआयडीसी परिसरात ८ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. तर, कंपनी ८ दिवस बंद असल्याने पगार कपात केली जाईल अशी देखील माहिती मिळाली होती, या निर्णयावर कामगार संघटनेने विरोध केला आहे. तर खासदार इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊन करणार असाल तर जनतेला विश्वासात घ्या व त्यांच्या जेवणाची व्यवस्था करा असा सल्ला देऊन जनसामान्यांच्या अनेक भूमिका मांडल्या होत्या.दरम्यान, आज देवेंद्र फडणवीस यांनी देखील औरंगाबादमध्ये दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी औरंगाबादेतील वाढत्या बधितांचा संख्येवर चिंता व्यक्त केली असून मृत्यूदर कमी असला तरी इन्फेक्शन रेट हा जास्त असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी घाटी रुग्णालयाचा देखील दौरा केला होता.

काल, राज्यातील २१९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ६८७५ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण संख्या २ लाख ३० हजार वर गेला होता. यासोबतच ४ हजार ६७ रुग्ण हे कोरोनामुक्त झाल्याने एकूण कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा १ लाख २७ हजार २५९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here