Home Breaking News 🛑 बावधनला साकारतंय विशेष उद्यान …! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो...

🛑 बावधनला साकारतंय विशेष उद्यान …! 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

139
0

🛑 बावधनला साकारतंय विशेष उद्यान …! 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

बावधन/पुणे:⭕प्रभाग क्र. 10 बावधन-कोथरूड डेपो एक पाऊल वचनपूर्ती कडे
बावधन परिसरात राहणाऱ्या नागरिकांकरीता आनंदाची बातमी …!

आपणांस कळविण्यात अतिशय आनंद होतो आहे की, हॉटेल डी पॅलेस समोरील वनविभागाच्या सुमारे 12.5 एकर जागेत (स.नं.3, बावधन खुर्द ) नागरिकांकरीता बावधन_नागरी_वन_उद्यान उभारण्यात यावे याकरिता मी ( #नगरसेवक_दिलीप_वेडेपाटील ) आपल्या सर्वांच्या सहकार्याने गेले अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत होतो. त्यासाठी मला तत्कालीन वनमंत्री मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार, मा.मंत्री आमदार श्री.चंद्रकात दादा पाटील, खासदार मा.गिरीशभाऊ बापट, आमदार भिमराव अण्णा तापकीर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सतत केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले; मिळालेल्या या यशाचे आपण सर्वजण साक्षीदार आहातच.
आज आपणा सर्वांसमोर या जागेत बावधन नागरी वन उद्यान ज्यामध्ये सर्वांना मोकळ्या हवेत फिरता येईल असा नैसर्गिक जॉगिंग ट्रॅक, लहान मुलांना खेळता येईल असे चिल्ड्रेन्स पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी पॅगोडा, पाण्याचा धबधबा, योगासाठी विशेष जागा तयार होत असल्याचे पाहिल्यावर माझ्या मनात एक सुखद आनंदाचा क्षण जागा झाला. तोच अविस्मरणीय क्षण आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न या मेसेज द्वारे मी करत आहे.
आपल्या सर्वांची साथ सदैव माझ्या पाठीशी राहू द्या; आपणांस वचन देतो की संपूर्ण प्रभागाचा अधिकाधिक विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ..!

बावधन असलेल्या वनउद्यानाच्या जागे मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी माझ्या समवेत मुख्य वनसंरक्षक विवेकजी खांडेकर, उप वनसंरक्षक ए.लक्ष्मी, सहाय्यक उप वनसंरक्षक वैभव भालेराव, वनपरिक्षेत्र पी.व्ही कापसे, नगरसेवक किरण दगडे पाटील, नगरसेविका सौ. अल्पना वरपे, नगरसेविका श्रध्दा प्रभूणे-पाठक उपस्थित होते.

दिलीप_वेडेपाटील नगरसेवक_पुणे_मनपा.⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here