• Home
  • 🛑 भाविकांनो भीमाशंकरच्या श्रावणातील यात्रेबाबत..! प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )

🛑 भाविकांनो भीमाशंकरच्या श्रावणातील यात्रेबाबत..! प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय 🛑 ✍️पुणे :( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )

🛑 भाविकांनो भीमाशंकरच्या श्रावणातील यात्रेबाबत..! प्रशासनाने घेतलाय मोठा निर्णय 🛑
✍️पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा )

घोडेगाव (पुणे) :⭕ श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भीमाशंकर येथील मंदिर बंद असल्याने भाविकांनी दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येऊ नये. तेथे येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहायक जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथील अस्मिता भवन येथे. श्री क्षेत्र भीमाशंकर यात्रा बंद ठेवण्याच्या पार्श्वभुमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी डुडी यांनी माहिती दिली. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, घोडेगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक प्रदिप पवार, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाउन झाले. तेव्हापासून श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर बंद आहे. श्रावण महिना 21 जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे भाविक आणि पर्यटकांनी येथे येऊ नये. मंदिर बंद असून पर्यटनही बंद आहे. भाविकांनी आणि पर्यटकांनी प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा तेथे येणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रांतअधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिला.  उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे म्हणाले की, श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरात दर्शनासाठी, पर्यटनासाठी कोणीही येऊ नये. डिंभे आणि पालखेवाडी येथे पोलिसांनी चेकपोस्ट उभारले आहे. जर कोणी या भागात फिरताना आढळल्यास गाडी जप्त करून संबधितांवर गुन्हे दाखल केले जाणार आहे. प्रशासनास सहकार्य करावे….🛑

anews Banner

Leave A Comment