• Home
  • 🛑 माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील “शनया”..! पुन्हा एकदा बदलणार…ही अभिनेत्री साकारणार “शनया” 🛑 ✍️चंदेरी दुनिया :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील “शनया”..! पुन्हा एकदा बदलणार…ही अभिनेत्री साकारणार “शनया” 🛑 ✍️चंदेरी दुनिया :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

🛑 माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील “शनया”..! पुन्हा एकदा बदलणार…ही अभिनेत्री साकारणार “शनया” 🛑
✍️चंदेरी दुनिया 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

चंदेरी दुनियेत :⭕जवळपास तीन महिन्यांहून अधिक काळ टीव्ही मालिकांचे चित्रीकरण थांबले होते. परंतु आता लवकरच तुमच्या या आवडत्या मालिका टीव्हीवर पाहता येणार आहेत.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेचे चित्रीकरण अगोदर ठाण्याला होत होते परंतु ज्या ठिकाणी हे चित्रीकरण केले जात होते त्या ठिकाणी आता सुरक्षेच्या कारणास्तव चित्रीकरणाला परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे ह्या मालिकेचा सेट नाशिकला रवाना केला आहे.

नाशिक येथील इगतपुरी या ठिकाणी मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसातच ती टीव्हीवर दाखवली जाणार आहे.मोजक्या टीम सोबत ही कलाकार मंडळी आता शूटिंगनिमित्ताने तिथेच राहणार आहेत. एडिटिंगचे कामही तिथेच करण्यात येणार असून मेकअप साठी लागणारे आर्टिस्ट देखील कमी करण्यात आले आहेत. फेस मास्क, सॅनिटायझर अशा आताच्या घडामोडी देखील मालिकेतून दर्शवल्या जाणार आहेत.

त्यामुळे या घडामोडी टीव्हीवर पाहायला प्रेक्षकांना निश्चितच आवडेल. मालिकेच्या चाहत्यांसाठी आणखी एक सुखावणारी बाब समोर आली आहे आणि ती म्हणजे “शनयाचे” पात्र पुन्हा एकदा बदलण्यात आले आहे. गुरुनाथ आणि राधिका यांच्या संसारात आडकाठी आणणारी ही नवीन शनया दुसरी तिसरी कोणी नसून अगोदरचीच शनया म्हणजेच “रसिका सुनील” हे पात्र पुन्हा एकदा साकारणार असल्याची चर्चा आहे.

सुरुवातीला रसिकाने रंगवलेली शनया प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलेली पाहायला मिळाली होती. परंतु रसिकाने आपल्या पुढील शिक्षणाच्या कारणास्तव ही मालिका अर्धवट सोडली होती. त्यानंतर हे पात्र ईशा केसकर हिने सांभाळले होते. आता हेच पात्र पुन्हा एकदा रसिकाकडे आल्याने मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. आणि अर्थातच त्यामुळे मालिकेचा टीआरपी वाढणार हेही वेगळे सांगायला नको…⭕

anews Banner

Leave A Comment