Home Breaking News 🛑 मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकत्र लढा…! अन्यथा पानिपत होईल :- धैर्यशील मोहिते...

🛑 मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकत्र लढा…! अन्यथा पानिपत होईल :- धैर्यशील मोहिते पाटील 🛑

112
0

🛑 मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून एकत्र लढा…! अन्यथा पानिपत होईल :- धैर्यशील मोहिते पाटील 🛑
✍️ सोलापूर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अकलूज/सोलापूर :⭕मराठा आरक्षणाबाबत विविध नेते विविध भूमिका मांडत असल्याने संभ्रमावस्था निर्माण होत असून आरक्षण प्रश्नी एकत्रीत लढा हवा अन्यथा “पानिपत” अटळ असल्याचे मत धैर्यशील मोहिते पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाजातील नेते विविध भूमिका समाजाच्या समोर मांडत आहेत शिवसंग्रामचे विनायक मेटे हे समाजाने ईडब्लूएस आरक्षणाचा लाभ घ्यावा म्हणून माध्यमातून सांगत आहेत तर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आरक्षण शक्‍य नाही म्हणून ईडब्लूएस आरक्षणाच्या बाजूने समर्थन करताना दिसतात.

खासदार छ. संभाजी राजे भोसले हे एसईबीसी आरक्षणाची लढाई लढू म्हणून सांगत आहेत तर खासदार छ.उदयनराजे भोसले आम्हाला आरक्षण नाही तर कुणालाही नाही म्हणून भावनिक आव्हान करत आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजात द्विधा मनःस्थिती निर्माण झाली आहे. या मराठा नेत्यांनी इतिहासातून बोध घेऊन एकजूट दाखवून लढाई लढावी अन्यथा मराठा आरक्षणाची वाटचाल पानिपताच्या दिशेने होईल.

न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सकल मराठा समाजाच्या मनस्थितीचा कधी उद्रेक होईल सांगता येत नाही अशा परिस्थितीत समाजातील नेते आरक्षणाबाबत विविध मत विचार मांडून समाजाला अधिकच संभ्रमित करीत आहेत. समाजातील सर्व नेत्यांनी एकत्रीत येत एक भुमिका घेत लढाई लढावी अन्यथा काढलेले पन्नास मोर्चे व मराठा तरुणांचे बलिदान व्यर्थ जाईल.

मराठा आरक्षणाचे “पानिपत” टाळायचे असेल तर सर्वांनी एकत्रीत येत एक भुमिका घेत अंतिम लढाई जिंकून न्याय हक्क मिळविने गरजेचे असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले…⭕

Previous article🛑 आयोगाची पत्रकाद्वारे माहिती…! नोव्हेंबरमधील परीक्षा पुढे ढकलल्या 🛑
Next article🛑 पुणे विभागातील सक्रिय रुग्ण संख्या ४९ हजार २५० 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here