Home माझं गाव माझं गा-हाणं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा, संपाबाबत मनसेने घेतला मोठा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा, संपाबाबत मनसेने घेतला मोठा निर्णय

122
0

राजेंद्र पाटील राऊत

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला मनसेचा पाठिंबा, संपाबाबत मनसेने घेतला मोठा निर्णय                                                  निफाड,(सागर कटाळे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- राज्यभरात एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्याने त्याची दखल आता राजकीय पक्षांना घ्यावी लागत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यात इशारा देण्यात आला होता की, एसटी कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये. त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा असंतोषाचा भडका उडेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आता राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू झाल्याने मनसेने या संपाला ठोस पाठिंबा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी मनसे असून आम्ही त्यांच्या आदोलनात सहभागी होत असल्याचे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात मनसेने एक पत्रकही प्रसिद्ध केले आहे. एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे, अशी मागणीही मनसेने केली आहे.

Previous articleलासलगाव आगार, नासिक विभाग पुन्हा संपात सहभागी
Next articleलग्न करुन देत नाही म्हणून विदर्भात मुलाकडून बापाचा खुन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here