मरखेल सपोनि लोनिकर यांचे अवाहान ; कुणीहि धार्मिक भावना दुखावतिल असे अक्षेपार्ह पोस्ट सोशलमिडिया वरून करू नये –
नांदेड, दि.४ ; राजेश एन भांगे
मरखेल पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या दि 05/08/2020 रोजी अयोध्या येथे राम मंदिर भूमीपूजन आहे. आपल्या भारत देशाची सर्वोच्च न्याय व्यवस्था मा सर्वोच्च न्यायालय यांच्या निकालाचा आदर करावा. आणि कोणीही सोशल मिडीयावर कोणीही एकमेकांच्या धार्मिक भावना दुखावतील आशा पोस्ट शेयर करू नये. जे कोणी समाजकंटक आक्षेपार्ह पोस्ट शेयर करतील त्यांचेवर नांदेड सायबर सेल व मरखेल पोलीस स्टेशन करडी नजर ठेवून आहे. आशा व्यक्तीवर गंभीर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे.
तरी व्हॅटसअप ग्रुप अडमिन यांना विनंती आहे की काही लोक हे धार्मिक भावना दुखवण्याच्या उद्देशाने किंवा नकळत पोस्ट शेयर करत असतात त्यामुळे ग्रुप अडमिन यांनी आज व उद्या सेटिंग मध्ये जाऊन msg send सेटिंग only admin करावे असे अवाहन सहाय्यक पोलिस निरिक्षक आदित्य लोणीकर
मरखेल पोलीस स्टेशन ता, देगलूरा यांनी केले.