• Home
  • *पेठ वडगांव शहर पुन्हा लाँकडाऊन*

*पेठ वडगांव शहर पुन्हा लाँकडाऊन*

*पेठ वडगांव शहर पुन्हा लाँकडाऊन*

कोल्हापूर प्रतिनिधी ( ब्युरोचिफ युवा मराठा न्यूज)

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना पाँझिटीव्ह रूग्णांच्या संखेत वाढ होत असुन, त्याच बरोबर पेठ वडगांव शहरातील कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वडगांव शहरातील काही नागरीकांनी कोरोना रूग्णांच्या वाढत्या संखेमुळे शहरात लाँकडाऊन करणेची मागणी केली असुन.
कोरोना संसर्गजन्य विषाणुला रोखनेसाठी वडगांव नगरपालिका प्रशासनाने विविध उपाय योजना राबविल्या जात आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात दिनांक ०५-०८-२०२० ते ०८-०८-२०२० चार दिवसांसाठी १००% लाँकडाऊन करण्याचा निर्णय घेतला असुन त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळून या मधे दुध डेअरी सकाळी ६ ते ९ व सांयकाळी ५ते सात या वेळेत चालू राहतील तसेच औषध दुकान , शेती भांडार दुकान, सर्व खासगी ल सार्वजनिक वैध्यकिय सेवा ,पशूचिकीत्सालय सेवा,तसेच सर्व बँका एटीएम त्यांच्या नियोजित वेळेत सोशल डिस्टन्स,मास्क, सँनीटायझर, चा वापर करून सुरू राहतील.
कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय पडूनये अन्यथा आपत्ती व्यवस्था अधिनीयम २००५ कलम ३४ भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम १८७९ व महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ /३ नुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे.
तसेच नागरिकांनी स्वतःची व आपल्या परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन वडगांव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष
श्री मोहनलाल माळी , उपनगराध्यक्ष श्रीशरद पाटील तसेच नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे)मँडम यांनी केले आहे.

anews Banner

Leave A Comment