Home बुलढाणा इसरुळ परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस अंगावर वीजपडून बैल ठार…

इसरुळ परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस अंगावर वीजपडून बैल ठार…

51
0

आशाताई बच्छाव

1000367813.jpg

इसरुळ परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस अंगावर वीजपडून बैल ठार…
युवा मराठा न्यूज मोताळा तालुका प्रतिनिधी संजय पन्हाळकर चिखली तालुक्यातील इसरुळ परिसरात शुक्रवार 11 मे रोजी दुपारी 4 ते 5 वाजेदरम्यान अचानक विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांची पार दैना उडाली. बाजरी, ज्वारी, मका या शेतामध्ये खुडून ठेवलेल्या पिकांना झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. तसेच काढणीला आलेल्या उडीद, कांदा या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
तर इसरुळ येथील शेतकरी श्री किसन फक्कडगीर गिरी या शेतकऱ्यांनी अंदाजे १ लाख रूपये किंमतीची बैलजोडी उन्हामुळे सावलीसाठी झाडाखाली बांधून ठेवलेल्या बैलांच्या अंगावर वीज पडल्यामुळे एक बैल ठार झाला आहे तर दुसरा बैल काही वेळ बेशुद्ध अवस्थेत होता.

या घटनेची माहिती इसरुळ चे सरपंच तथा चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष सतीश पाटील भुतेकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांना दिली. तहसीलदार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी गोविंदराव चव्हाण यांनी घटनेचा पंचासमक्ष पंचनामा केला. चिखलीचे पशुवैद्यकीय अधिकारी पडोळ साहेब व शेळगाव अटोळ चे डुकरे यांनी मृत बैलाची पाहणी करून शवविच्छेदन करून अहवाल तयार केला. यावेळी आपदग्रस्त शेतकरी व पंच मंडळी हजर होती शासनाकडून आपदग्रस्त शेतकऱ्यास मदतीची अपेक्षा लागून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here