Home अमरावती नागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त...

नागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त पदाकडे शासनाचे दुर्लक्ष.

223

आशाताई बच्छाव

1000367799.jpg

नागपूर व अमरावती या दोन्ही विभागाची एकाच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे जबाबदारी, रिक्त पदाकडे शासनाचे दुर्लक्ष.
दैनिक युवा मराठा
पीएनदेशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २६ जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच चार ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, येथे राम भरोसे कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाले आहे. राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे; मात्र’कीपोस्ट’वर अधिकारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभार वर आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरू आहे. अमरावती व नागपूर या दोन्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे सोपीनाथ आली आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरटीओसी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मोटर वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत; परंतु ३० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांदण्या पासून तर बांधापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे. पदोन्नती रखडली कामे वाढली प्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डेप्युटी आरटीओ, ए आर टी ओ या श्रेणीत बदलती रखडली आहे. त्यामुळे पदोन्नती शिवाय वरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागत आहे. यात बहुतांशा मोटार वाहन निरीक्षक वाहन निरीक्षकांना सुद्धा पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. वनवा ही मोठी समस्या आहे. तसेच आरटीओ नवीन आकृती बंद लागू झालेली असून, राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यात यात जुने ४०० मध्ये खालीच करून नव्याने काही पदांना अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबवीतांना७० टक्के कर्मचाऱ्यांची पदे अपग्रेट झाली आहेत. मात्र आजही आरटीओ, डेप्युटी आरटीओ, ए आर टी ओ या पदावर वरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा आस आहे. या आरटीओच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार जितेंद्र पाटील मुंबई, दिनकर मनोहर मुंबई, संदेश चव्हाण मुंबई, प्रकाश जाधव मुंबई, अशोक पवार मुंबई पश्चिम, विनायक अहिरे मुंबई पूर्व, अभय देशपांडे पनवेल, दीपक पाटील कोल्हापूर, प्रदीप शिंदे नाशिक, स्टीव्हन अल्वारिस धुळे, संजय मेत्रवार संभाजीनगर, रामभाऊ गीते नागपूर, गजानन नेरपगार लातूर, विनोद साळवी कल्याण, नंदकिशोर काळे सिंधुदुर्ग, अर्चना गायकवाड सोलापूर, राजेंद्र केसकर बारामती, उर्मिला पवार श्रीरामपूर, विनोद सागरे सांगली, ज्ञानेश्वर हिरडे यवतमाळ, हर्षल डाके नागपूर शहर, मोहम्मद समीर वर्धा, स्वप्निल माने बीड, अनंत जोशी हिंगोली, प्रकाश जाधव मुंबई या आरटीओच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई मध्य, ठाणे वपुणे येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी पद निरंक असल्याचे आहे.

Previous articleतुळजाभवानी मंदिरात आठ कोटी शेहचाळीस लाखांचा अपहार
Next articleइसरुळ परीसरात विजांच्या कडकडाटासह पाऊस अंगावर वीजपडून बैल ठार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.