Home संपादकीय विशेष संपादकीय… मा.मुख्यमंत्री साहेब… ना.एकनाथ शिंदेच्या मालेगांव दौऱ्यानिमित !

विशेष संपादकीय… मा.मुख्यमंत्री साहेब… ना.एकनाथ शिंदेच्या मालेगांव दौऱ्यानिमित !

69
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220728-212141_Google.jpg

विशेष संपादकीय…✍️
मा.मुख्यमंत्री साहेब…
ना.एकनाथ शिंदेच्या मालेगांव दौऱ्यानिमित !
(राजेंद्र पाटील राऊत)
शिंदे साहेब,
आपले या मालेगांव महानगरीत युवा मराठा परिवार अगदी हदयाच्या अंतकरणापासून मनपूर्वक स्वागत करीत आहे.साहेब,मालेगांव महानगरीला खरं तर खुप मोठा ऐतिहासिक व इतिहासकालीन असा वारसा आहे.गिरीपर्णा व मोक्षगंगा नदीच्या संगमावर वसलेले हे शहर कधी मल्लेगांव तर माहुलीग्राम असा प्रवास करीत आजच्या मालेगांव शहरात नामांतरीत झालेले आहे.येथे विणकरांची अर्थातच पाँवरलुम कारखानदार व मजुरांची संख्याही मोठी आहे.या शहराला जिल्ह्याचा दर्जा देण्याचे गाजर यापूर्वीच अनेक सरकारांनी दाखविली.पण त्याची वचनपूर्ती कुणीच करु शकले नाही.बँरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री होते,तेव्हा झालेली घोषणा अजूनही भिजत घोंगडयाप्रमाणेच रखडत पडलेली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले व आपली नावरास एकच असल्याने आपण आपल्या या दौऱ्यात मालेगांव जिल्हा निर्मितीचा प्रश्न तडीस लावालच ही आस मालेगांवसह कसमादेना पट्टयातील नागरिक बाळगून आहेत.साहेब,आज या शहरात जिल्ह्यासाठी अनुकल असलेले असे प्रशासकीय कार्यालये आहेत.जिल्ह्यासाठी अत्यावश्यक असलेली सगळी कार्यालयासाठी मोक्याची ठिकाणे या शहर परिसरात आहेत.मालेगांव जवळच असलेल्या कौळाणे येथे सयाजीराव महाराजांचा अत्यंत असा विस्तीर्ण राजवाडा आज अनेक शासकीय कार्यालयाची गरज जिल्हा निर्मिती नंतर सोडविण्यासाठी कामी येऊ शकतो.त्याशिवाय या शहराला महानगरपालिकेचा दर्जा दिला खरा.पण….अजूनही पाहिजे तसा विकासच या शहरात झालेला नाही.मालेगांव महानगरपालिकेची हद्दवाढ ही फक्त नावापुरतीच झाली.मात्र विकासाच्या नावाने अजूनही ठणठण गोपाळच आहे.या शहराला आशिया खंडातल्या नंबर एकच्या झोपडपट्टया असलेल्या धारावी शहरानंतर दुसऱ्या क्रमांकावर मालेगांवचे नाव घेतले जाते.साहेब,आपण आपल्या उद्याच्या मालेगांव दौऱ्यात या शहरासाठी काही तरी मोठा करिश्मा करुन या शहराला जिल्ह्याचा दर्जा देऊन या शहराचा चेहरामोहरा बदलून टाकाल,ही अपेक्षा बाळगून या भागातला सामान्य माणूस ते उद्योजकापर्यत सारेच आस लावून बसलेले आहेत.आणि या दौऱ्यात आपणांकडून जास्त काय मागणे,पण…काही नाही निदान मालेगांव जिल्ह्याची मागणी आपण या भागातल्या नागरिकांच्या पदरात टाकली तरी शंभर किलोमीटरवर शासकीय कामासाठी जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचेल,आणि हेच महत्त्वाचे मागणे आपल्या दौऱ्यानिमिताने आम्ही जनतेचा आवाज म्हणून करीत आहोत.एव्हढेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here