• Home
  • वादळात 22 लाखाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास शासनाकडून 5 हजाराची तुटपुंजी मदत प्रतिनिधी =किरण अहिरराव

वादळात 22 लाखाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास शासनाकडून 5 हजाराची तुटपुंजी मदत प्रतिनिधी =किरण अहिरराव

वादळात 22 लाखाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास शासनाकडून 5 हजाराची तुटपुंजी मदत

प्रतिनिधी =किरण अहिरराव

वादळात 22 लाखाचे नुकसान झालेल्या अंदरसुल येथील पोल्ट्री व्यावसायिकाला शासनाकडून 5 हजाराची तुटपुंजी मदत पोल्ट्री व्यावसायिकाची क्रूर चेष्टा दिनांक 3 जून रोजी आलेल्या वादळी पावसाने अंदरसूल येथील शेतकरी गजानन देशमुख यांच्या पोल्ट्री चे संपूर्ण शेड उडून सुमारे 22 लाखाचे नुकसान झाले होते दरम्यान पालकमंत्री छगन भुजबळ खासदार भारती ताई पवार यांनी नुकसानीची पाहणी करून शासनामार्फत योग्य ती मदत मिळवून देऊ असे आश्वासन दिले होते.मात्र सरकारने एक महिन्याच्या कालावधीत शेतकऱ्याला अवघी 5 हजाराची तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पुसले आहे. शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत किमान 5 लाखाची मदत करावी अशी अपेक्षा होती. यावेळी गजानन देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मंत्र्यांच्या दौऱ्याला नक्की माझ्या नुकसान भरपाई पेक्षाअधिक खर्च आला असेल ही भावना व्यक्त करून शासनाच्या तुटपुंज्या निधीमुळे नाराजी व्यक्त केली आहे

anews Banner

Leave A Comment