Home मुंबई महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोवीड सेंटर बंद होणार!

महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोवीड सेंटर बंद होणार!

73
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220729-190203_Google.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे; महाराष्ट्रातील सर्वात मोठे कोविड सेंटर बंद होणार; शुक्रवार दिनांक २९/०७/२०२२. महाराष्ट्र , मुंबई या ठिकाणी बांधण्यात आलेले जम्बो कोविड सेंटर याला सर्वात मोठे कोविड सेंटर म्हणून मान्यता मिळाली होती. मुंबईमधील लॉकडाऊन च्या काळामध्ये या ठिकाणी लाखो लोकांना उपचार मिळाले व सर्व सुख सोयी या ठिकाणी मिळाल्या. परंतु आता मुंबईतील कोविड ची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून त्यामुळे सेंटर बंद करण्याच्या मार्गावर त्याची आवरावर सुरू आहे. येथून पुढे मुंबई या ठिकाणी कोविड चे रुग्ण आढळल्यास त्यांचे उपचार महानगरपालिकेच्या व खाजगी दवाखान्यामध्ये करण्यात येणार आहेत. कोविडच्या लसीचे उपक्रम इथून पुढे चालत राहणार आहेत ते बंद होणार नाही याचीही ग्वाही मुंबई महापालिकेने दिलेली आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये कोविडच्या रुग्णांना चांगली उपचार मिळेल परंतु संख्या घटत असल्यामुळे जम्बो कोविड सेंटर बंद करण्यात येईल व त्याची आवरावर या ठिकाणी चालू आहे. ही संख्या घटक असल्याने मुंबईतील लोकांना दिलासा मिळाला आहे व त्यांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. मास्क व सॅनिटरी चा वापर करत राहा व इथून पुढच्या काळामध्ये कोविड ची संख्या वाढणार नाही याची सर्व मुंबईकरांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here