Home जालना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला

128
0

आशाताई बच्छाव

IMG_20231207_184330.jpg

जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी शर्मा कुटुंबीयांची भेट घेऊन धीर दिला
जालना, दि. ७ (दिलीप बोंडे)-जालना शहरात कॉलेज रोडवरील सोमेश रेसिडेन्सी
येथील रहिवासी सुशीलकुमार शर्मा यांच्या घरात दिवसाढवळ्या घुसून महिलांना
पिस्तूल व लोखंडी रॉडचा भाग दाखवून दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची
अत्यंत सनसनाटी घटना घडली. या घटनेमुळे शहरात सर्वत्र एकच खळबळ उडाली
असून संबंधित कुटुंब अत्यंत भयभीत झाले.
सदरील घटनेची माहिती कळल्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांनी संबंधीत सुशिलकुमार शर्मा यांच्या घरी जाऊन घटनेची व्यवस्थित
माहिती घेतली. कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून भयभीत झालेल्या
कुटुंबीयांना धीर देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आपल्या
पाठीशी ठाम असल्याचे सांगितले.  तसेच पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क करून
सदरील गुन्हेगारांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करून कडक शासन
करण्याची मागणी केली. ज्यामुळे सामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झालेली
भीती नाहीसी होईल असे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर म्हणाले.
००००००००००

७-जालना शहरात कॉलेज रोडवरील सोमेश रेसिडेन्सी येथील रहिवासी सुशीलकुमार
शर्मा यांच्या घरात दिवसाढवळ्या घुसून महिलांना पिस्तूल व लोखंडी रॉडचा
भाग दाखवून दागिने व रोख रक्कम लुटून नेल्याची अत्यंत सनसनाटी घटना घडली
होती. या शर्मा कुटूंबियांची शिवसेना  जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर
यांनी भेट घेवून धिर दिला.

Previous articleतुपकर मुरमाडी येथे भरड धान्य महोत्सवाचे आयोजन
Next articleअवैध गौण खनिज मुरूम उत्खननावर तहसीलदारांची कार्यवाही
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here