Home नांदेड शासकीय स्तरावर लेक लाडकी योजनेचा प्रचार व प्रसार करून लाभार्थ्यांना या योजनेचा...

शासकीय स्तरावर लेक लाडकी योजनेचा प्रचार व प्रसार करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा- निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

194
0

आशाताई बच्छाव

IMG_20231219_190349.jpg

शासकीय स्तरावर लेक लाडकी योजनेचा प्रचार व प्रसार करून लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा- निवेदनाद्वारे उपजिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

देगलूर तालुका प्रतिनिधी,(गजानन शिंदे)

देगलूर:-महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी दिनांक 1 एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीसाठी, मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन, मुलीचा जन्मदर वाढवण्यासाठी, मुलीचे शिक्षणात चालना देण्यासाठी ,मुलीचा बालविवाह व मुलीचे मृत्यू दर कमी करण्यासाठी, शाळाबाह्य मुलीचे प्रमाण शून्यावर आणण्यास आणण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी व कुपोषित मुली कमी करण्यासाठी, यांना या लेक लाडकी योजनेचा फायदा पाच टप्प्यात देण्याचे ठरविले असून, ती रक्कम मुलीच्या जन्म झाल्यावर पाच हजार रुपये ,मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये ,मुलगी सहावीत गेल्यावर सात हजार रुपये ,मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये ,मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये ,अशी एकूण लाभ ,एक लाख एक हजार रुपये मिळणार आहेत त्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजना लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी आपण सर्व अशा सेविका व अंगणवाडी सेविका व सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊन जनजागृती करून प्रत्येक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा यासाठी आज देगलूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख घाळप्पाजी आंबेसंगे ,शहर प्रमुख व्यंकटरावजी पुरमवार साहेब, शिवसेना महिला उपजिल्हाप्रमुख सविताताई चप्पलवार शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी, तालुका संघटक महेश करंडे सोशल मीडिया अध्यक्ष दिगंबरराव जाधव ,यांच्या समवेत अनेक जण उपस्थित होते…

Previous articleदेगलूर महाविद्यालयातील चार विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी
Next articleअवैध पणे गुटखा विक्री करणारा इसम मुंबई नाका पोलिस ठाण्यात जेरबंद करण्यात आला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here