Home भंडारा पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव मशानभूमी जवळ मजूर नेणारे वाहन पलटले ,...

पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव मशानभूमी जवळ मजूर नेणारे वाहन पलटले , तब्बल 27 मजुर जखमी…

210
0

आशाताई बच्छाव

1000369298.jpg

पवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव मशानभूमी जवळ मजूर नेणारे वाहन पलटले , तब्बल 27 मजुर जखमी…

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ 12 मे 2024 ला सकाळी ७.३० वाजता दरम्यान मजुर नेणारे (Bhandara Accident) वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले. त्यातील १४ मजुरांवर उपचार सुरू आहेत. तर २ गंभिर जखमी मजुरांना (Bhandara Hospital) भंडार्‍याला हलविण्यात आले. जखमी मजुर हे अड्याळजवळील नेरला येथील असून सोनेगाव येथे धान कापणीला जात होते. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी धडाक्यात सुरू आहे. शेतकरी हार्वेस्टर व मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. धान कापणीला मजुर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजुर नेऊन शेतीची कामे उरकून घेत आहेत. अड्याळ जवळील नेरला येथील २७ मजुर हे धान कापणीकरीता टाटाएस वाहन क्र.एम एच ३६ एफ १०६० या वाहनाने नेरला येथून सोनेगाव येथे 12 मे 2024 ला सकाळी ७.३० वाजता दरम्यान नेत असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे रा. नेरला याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन अनियंत्रित होवून शेतबांधित उलटले. त्यात वाहनातील २७ मजुर जखमी झाले. अपघाताची माहिती गावात होताच गावकर्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

धान कापणीला जात होते मजुर :-
या अपघातात जखमी मजुरांमध्ये छाया नेपाल भोयर (३४), मालु मोहन कावळे (३०), भागरथा धनराज आरीकर (५०), निर्मला तोताराम वाकडे (३५), शेवंता लेकराम भाकरे (५२), रोमीता उमेश बावणे (३८), वंदना दिनेश वाकडे (२५), मुक्ता रामलाल वाकडे (४०), जीरा रामेश्वर भोयर (६३), देवका रामदास पाल (५०), सिंधू रामु काकडे (५९), सिमा अतुल शहारे (३५), लता पुरूषोत्तम भोयर (४०), आशा वाकडे (४५), चालक महेंद्र मुरकुटे (३१), जयश्री ठाकरे (४०), गीता शहारे (३५), रंजना हिवरकर (२२), रिना बागडे (२०), भारती ठाकरे (३०), पंचफुला भोयर (६०), वंदना माकडे (२५), देवला ढोक (५०), दुर्गा चौधरी (३९), सरीता रोहनकर (३२), दुर्गा रोहनकर (४०), कुंदा ठाकरे (३५) यांना उपचाराकरीता ग्रामीण रूग्णालय अड्याळ येथे पाठविण्यात आले. उपचारानंतर १३ जखमींना (Bhandara Hospital) प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली. तर १२ जखंमीवर अड्याळ येथे उपचार सुरू आहेत. तर २ जखमींना भंडाराला हलविण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जाते.

Previous articleपवनी तालुक्यातील अड्याळ जवळील सोनेगाव मशानभूमी जवळ मजूर नेणारे वाहन पलटले , तब्बल 27 मजुर जखमी…
Next articleवाहतूक पोलीस रस्त्यावर; १०५१ चालकांना ई चालान पोलीस आयुक्तांनी टोचले होते कान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here