Home उतर महाराष्ट्र आ. गडाख धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व : ढोक महाराज

आ. गडाख धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व : ढोक महाराज

47
0

आशाताई बच्छाव

1000307222.jpg

आ. गडाख धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व : ढोक महाराज

सोनई , कारभारी गव्हाणे तालुका प्रतिनिधी: समाजजागृतीचे काम संत-महंत आपल्या वाणीने व कार्याने करतात. या कार्यात त्यांना समाजाचे व नेतृत्वाचे सहकार्य लाभल्याने संतांचे कार्य अखंड सुरू राहते. आ. गडाख संत, महंत यांचा सन्मान जपत धार्मिक कार्याला पाठबळ देणारे नेतृत्व असून, गडाख यांचे धार्मिक क्षेत्रातील कार्य नियमित सुरू राहो, अशा सदिच्छा रामनाथ महाराज ढोक यांनी व्यक्त केल्या.
आ. शंकरराव गडाख यांच्या निवासस्थानी आयोजित धार्मिक कार्यक्रमप्रसंगी रामायणाचार्य रामनाथ महाराज ढोक यांच्या सत्काराप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आ. शंकरराव गडाख यांच्यासह संत, महंत व गडाख
कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.
ढोक महाराज म्हणाले की, कथा, कीर्तन, विविध सप्ताह यांची मोठी परंपरा तालुक्याला लाभलेली आहे.
त्या परंपरेला आत्मीयतेने बळ देण्याचे काम आ. गडाख नेहमी करतात. याचा विशेष अभिमान असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here