Home नांदेड पंचनाम्यासाठी पैसे घेणाऱ्यांची तक्रार करा,कार्यवाही होईप्रयन्त पाठीशी राहू:-कलंबरकर.

पंचनाम्यासाठी पैसे घेणाऱ्यांची तक्रार करा,कार्यवाही होईप्रयन्त पाठीशी राहू:-कलंबरकर.

334

राजेंद्र पाटील राऊत

पंचनाम्यासाठी पैसे घेणाऱ्यांची तक्रार करा,कार्यवाही होईप्रयन्त पाठीशी राहू:-कलंबरकर.

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
प्रतिनिधी)-दिनांक १४ सप्टेंबर रोजी आलेल्या महापुराने होत्याचे नव्हते करून टाकले आहे.शेती,घर,पूल वाहून गेली.संसार उघड्यावर आला.प्रशासनाने या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी गावनिहाय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आदेश दिले.प्रशासन नुकसानीचे पंचनामे करत आहे.हे पंचनामे करतांना अत्यंत निंदनीय प्रकार होत आहेत.संकटात सापडलेल्या व्यक्तींचे पंचनामे करतांना पैसे घेण्याच्या तक्रारी तालुक्यातून येत आहेत.अशी तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी तालुका कृषी अधिकारी बिऱ्हाडे साहेब यांच्याकडे केली.तेव्हा त्यांनी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची तक्रार करा.तीन दिवसात त्यांच्यावर कडक कार्यवाही करू,असा शब्द दिला आहे.
शेतकऱ्यांनी पंचनाम्यासाठी पैसे देण्याची गरज नाही.पैसे मागणाऱ्या कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांनी तक्रार करावी,आपण कडक कार्यवाही होईप्रयन्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभिर उभे राहू,असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवाजिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी केले.

Previous articleपुणे जिल्हयातल्या भोर तालुक्यातील महामार्ग पट्ट्यात होणार अपघातग्रस्त जनतेची गैरसोय आता दूर …!
Next articleरोहन सूनगार युवकाने सापडलेले दोन लाख रुपये प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे घडविले दर्शन.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.