Home कोल्हापूर रोहन सूनगार युवकाने सापडलेले दोन लाख रुपये प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे घडविले...

रोहन सूनगार युवकाने सापडलेले दोन लाख रुपये प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे घडविले दर्शन.

440
0

राजेंद्र पाटील राऊत

रोहन सूनगार युवकाने सापडलेले दोन लाख रुपये प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे घडविले दर्शन.             कोल्हापूर (राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

पेठ वडगाव सहारा चौक येथील तरुण मंडळातील कार्यकर्ता रोहन सुनगार यांनी दोन लाख रुपये परत करून प्रामाणिकपणे चा आदर्श ठेवला आहे. प्रामाणिकपणाबद्दल वडगाव शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक घोळवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख उपस्थिती नगरसेवक संदीप पाटील काँग्रेसचे वडगाव शहर अध्यक्ष सचिन चव्हाण युवक क्रांती महाआघाडी चे सचिव अविनाश तेली पत्रकार राहुल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विनोद सोनुले एक स्क्रॅप चे व्यापारी असून कामानिमित्त सांगलीला गेले होते नंतर त्यांच्या लक्षात आले की आपली दोन लाखाची पैशाची बॅग सहारा चौक येथे विसरले आहे. गोंधळलेल्या अवस्थेत त्यांनी रोहन सुनगार या युवकास फोन केला. सहारा चौक येथे माझी बॅग दिसली आहे आहे का तिथे त्यांनी बघायला सांगितले तात्काळ रोहन सुनगार या युवकाने ती बॅग आहे असे सांगितले व प्रामाणिकपणे दोन लाख रुपये असलेली बॅग परत केली त्याबद्दल सर्व वडगाव मध्ये या युवकाचे कौतुक केले जात आहे या कार्यक्रमास बबलू खाटीक शंकर बागडी समीर मुजावर सागर गायकवाड दीपक मुदुशीवाले, आशिष पाटील प्रवीण पाटील, उमेश पाटील भालचंद्र कोळी, विकास कोळी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here