• Home
  • 🔴 *ब्रेकींग न्यूज*🔴

🔴 *ब्रेकींग न्यूज*🔴

🔴 *ब्रेकींग न्यूज*🔴

*कोल्हापूर (ब्युरो चिफ युवा मराठा न्यूज)*

*टोपमधील कोरोनाबाधित महिलेचा* *उपचारादरम्यान मृत्यू.*

हातकणंगले तालुक्यातील टोप गावातील शनिवार (दि१८) रोजी घरी आजारी असणारी ४५ वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांना अस्वस्थवाटु लागल्याने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे दाखल केले होते. उपचार सुरु असताना रविवारी मध्य रात्री मृत्यू झाला.

काही दिवसापुर्वी गावातील एका डॉक्टरकडे तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना अधिकच अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना उपचाराकरिता सीपीआरला दाखल केले होते. त्यावेळी त्यांचा स्वॅब घेतला असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, उपचार सुरु असतानाच काल रविवारी मध्यरात्री या महिलेचा मृत्यू झाला.

यामुळे गावात पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्याचे अनेकाचे स्वॅब तपासणी साठी घेतले असून त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. खबरदारी म्हणून घरीच सुरक्षित राहण्याचे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.

anews Banner

Leave A Comment