Home गडचिरोली गडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

गडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220825-WA0060.jpg

गडचिरोलीत अतिदक्षता विभाग सुरू करा : भाई जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

गडचिरोली (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) : गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाचे, तत्कालीन पालकमंत्री आणि आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते उद्घाटन होवून दोन वर्षे उलटल्यानंतरही फायर ऑडिटच्या नावाखाली बंद आहे, हे अतिदक्षता विभाग तातडीने सुरू करुन जिल्ह्यातील जनतेला सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी आज विधानपरिषदेत केली.

उल्लेखनीय की, गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्यातील अत्याधुनिक अतिदक्षता विभागाची निर्मिती लाखो रुपये खर्चून करण्यात आली.त्याचे उद्घाटन तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले, मात्र दोन वर्षांचा कालावधी लोटूनही तो सुरू होवू शकला नसल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांनी १६ जून रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतरही सदरचे अतिदक्षता विभाग जनतेसाठी सुरू होवू शकले नव्हते.

आज याबाबत विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करतांना भाई जयंत पाटील यांनी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा व्याहाड येथे राष्ट्रीय महामार्गाजवळ विकत घेतलेल्या दहा एकर जमीनीशी या अतिदक्षता विभागाच्या भ्रष्टाचाराशी काही संबंध आहे काय याचीही शासनाने चौकशी करावी, अशीही मागणी केली.

Previous articleचिमूर ता.भाजपा च्या महिला आघाडीच्या वतीने रक्षाबंधन सोहळा आयोजित……
Next articleचवे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी पुन्हा श्रीनिवास जोशी यांची बिनविरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here