Home भंडारा क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव कटिबध्द राहणार- गायत्री वाघमारे

क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव कटिबध्द राहणार- गायत्री वाघमारे

77
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20231030-075050_WhatsApp.jpg

क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव कटिबध्द राहणार- गायत्री वाघमारे

इंदुरखा येथे सिमेंट रस्त्यांचे भूमिपूजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – देश, राज्य व जिल्हयाचा विकास साधायचे असल्यास प्रथम ग्रामीण भागातील विकास होणे गरजेचे आहे. त्याकरिता अन्न, वस्त्र निवारा याबरोबर शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी व रस्ते या मुलभुत गरजांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन त्याचे योग्य नियोजन करून त्यांच्या समस्या सोडविणे आवश्यक आहे. म्हणुन क्षेत्राच्या विकासाकरिता सदैव कटिबध्द राहणार असे मत जिल्हा परिषद सदस्या गायत्री वाघमारे यांनी केले.
त्या तालुक्यातील इंदुरखा ते कोथुर्णा येथील मार्गाची अत्यंत बिकट अवस्था असल्याने या मार्गाने ये-जा करण्यासाठी नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. म्हणुन जिल्हा परिषद सदस्या गायत्री वाघमारे यांनीआपल्या स्थानिक नियोजनातून विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. त्याप्रमाणे आपल्या क्षेत्रातील भागात प्राधान्य क्रमाने अनेक गावांमध्ये आपल्या विकास निधीतून निधी दिला आहे. इंदुरखा ते कोथुर्णा येथे स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपयांच्या सिमेंट रस्त्याच्या बांधकामाचे भुमीपूजन करण्यात आले.
त्यावेळी जिल्हा परिषद सदस्या गायत्री वाघमारे, इंदुरखा येथील सरपंच प्रगती एस. भुरे, उपसरपंच सदानंद मोहतूरे, माजी सरपंच गजानन मोहरकर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, खैरी येथील सरपंच मुलचंद ईश्वरकर, ग्राम पंचायत सदस्य माधोराव भुरे, डॉ. मधुसुधन वाघमारे, प्रतिष्ठित नागरिक अखाडू हरकंडे, विलास केजरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्यारेलाल वाघमारे यांनी शहराप्रमाणेच गावाचाही विकास झाला पाहिजे या उद्देशाने भंडारा तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामाकरिता निधी दिला जात असून प्राधान्यक्रमाने त्याचे भुमीपुजन होत आहेत. तर गावाच्या विकासासाठी दिलेल्या निधीबद्दल ग्रामपंचायत सरपंच प्रगती एस. भुरे सह‌ सर्व सदस्य व गावकऱ्यांनी वाघमारे यांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्तेकरिता‌ श्यामु कडव, दिलीप मोहतुरे, रमेश बोंदरे, अरूण मते, पूष्पा रामटेके, शेखर ईश्वरकर, दर्शन भुरे, महेश मोहतुरे, विनोद बचेरे, रोशन बन्सोड, अमृत खापेकर, दिंगाबर मोहतुरे, रोशन बन्सोड, दर्शन दिपटे, खिमांश पडोळे, प्रल्हाद पुडके, बंडू बनराके, मंगेश पडोळे, देवेंद्र गौतम व कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळींनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here