Home Breaking News 🛑 धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन 🛑 ✍️जालना :(...

🛑 धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन 🛑 ✍️जालना :( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

118
0

🛑 धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचे कोरोनामुळे निधन 🛑
✍️जालना 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

जालना : राज्यात कोरोनाचा प्रसार होऊन ३ महिने झाले असून बधितांचा वाढता आकडा व प्रशासनाच्या अपुऱ्या सोयीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या २ लाख १२ हजारांवर गेली असून गेल्या २ ते ३ दिवसात अनेक जिल्ह्यात कोरोनाने उच्चांक गाठला आहे.
अनेक बड्या नेत्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील कोरोनाचा विळखा बसत आहे.यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि जालना जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष रमेशचंद्र तवरावाला यांचे औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.

काही दिवसांपूर्वी तवरावाला यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे प्रथम त्यांना जालना येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना औरंगाबाद येथील धुत हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. सुरुवातीस त्यांची प्रकृती स्थीर होती. परंतु नंतर त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही आणि मंगळवारी सायंकाळी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.दरम्यान, नुकताच औरंगाबाद मधील शिवसेनेच्या दोन माजी नगरसेवकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांमुळे दोन्ही शहरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पुनश्च हरी ओम जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केला असला तरी राज्यातील अनेक जिल्हे व शहरातील कोरोनाची वाढती गंभीर परिस्थिती बघता त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्यात येत आहे….⭕

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here