Home पालघर पालघर पोलिसांना यश ७ दरोड्यातील आरोपी जेरबंद.

पालघर पोलिसांना यश ७ दरोड्यातील आरोपी जेरबंद.

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0042.jpg

पालघर पोलिसांना यश ७ दरोड्यातील आरोपी जेरबंद.
पालघर, (वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
८ जून ला बोईसर पालघर रोडवरील कोळगाव पेट्रोलपंप येथे मोटारसायकल वरील ज्वेलर्स मालकाला लुटणाऱ्या आरोपींना पकडण्यास आणि मुद्देमाल हस्तगत करण्यास पालघर स्थानिक गुन्हे शाखा यांना यश आले आहे. या बाबतीत आयोजित पत्रकार परिषदेत पालघर चे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी माहिती दिली.
या गुन्ह्यातील आरोपींची ज्वेलर्स च्या मालकाची दैनंदिन माहिती मिळवून त्यांच्या ऍक्टिवा गाडीवरून अडवून लूटण्यात आले होते.आरोपी दोन मोटारसायकल वरून येऊन ज्वेलर्स मालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारून नंतर त्यांच्या डोळ्यात मिरची फूड टाकून त्याला मारहाण करून ऍक्टिवा ची डिक्की खोलून त्यात असलेले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख पंधरा हजार रुपये असा एकूण ₹३१०००० घेऊन फरार झाले होते. ज्वेलर्स मालकाच्या फिर्यादी वरून पालघर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ह्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखे कडे देण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत कोणताही धागेदोरा नसताना देखील परराज्यातून दोन आणि पुणे येथून पाच आरोपींना अटक करून त्यांच्या कडून चोरीला गेलेल्या मुद्देमाल सहित एक मारुती अल्टो गाडी,दोन केटीएम डीयुक्त,आणि एक स्पेनडर मोटारसायकल,सह दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींन मध्ये अनिरथ नानावट,वेद राजपूत, अजित राठोड, जितू राजपूत, अविनाश चामढा,मोहन राजपूत, आणि अन्य एक आरोपी असे एकूण सात जणांना अटक करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशाने आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, पोलीस उपविभागीय अधिकारी नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अजय वसावे, पालघर चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षण आशिष पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी यांनी योग्य तपास करून गुन्ह्याची उकल केली आहे.
या पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी पोलीस अधीक्षकांना जिल्ह्यातील महिला बेपत्ता होत आहेत,त्या पोलीस ठाण्याचे माहिती मागितली असता, बोईसर, पालघर, विक्रमगड, वाडा या पोलीस ठाण्यात महिलांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण सरासरी पेक्षा जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जास्त गुन्हे घडण्याचे प्रकार हे वाडा, बोईसर, मनोर, कासा, तलासरी या ठाण्या अंतर्गत जास्त आहे.त्यातील १००% गुन्हे डिटेक्त झाल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले.

Previous articleपिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन
Next articleएम आई डी सी स्फोटाने हादरली –औद्योगिक सुरक्षा संचनालय आऊट ऑफ रेंज –जिल्हा मुख्यल्यात जागा उपलब्ध तरीही वसई येथेच कार्यालय
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here