• Home
  • 🛑 विरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक 🛑

🛑 विरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक 🛑

🛑 विरारमध्ये रेल्वे स्थानकात सामान्य प्रवाशांचा उद्रेक 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 8 सप्टेंबर : ⭕ विरार रेल्वे स्थानकात काल संतप्त प्रवाशांनी अघोषित आंदोलन केले. सामन्यांसाठी लवकरात लवकर लोकल सेवा सुरु करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते.या घटनेमुळे रेल्वे स्थानकात तणावपूर्ण वातावरण पसरले होते.

कोरोनामुळे काही महिन्यापासून सामन्यांसाठी लोकल सेवा ठप्प असल्याने याचा सर्व ताण बस सेवेवर पडत आहे. त्यामुळे प्रवाशांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यातही बस मिळेल कि नाही याची शाश्वती नसते. त्यामुळे हा रोजचाच मनस्ताप झालेला.

दरम्यान दरदिवशी प्रमाणे आज ही प्रवाशी बस साठी रांगेत उभे होते. मात्र बसच्या तुटवड्यामुळे नागरीकांची मोठी पंचाईत झाली होती.त्यामुळे बस स्थानकात उभे असलेले प्रवाशी संतप्त होत रेल्वे स्थानकात पोहोचले. यावेळी प्रवाशांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत लवकरात लवकर लोकल सुरू करावी अशी मागणी केली.यावेळी जवळपास शेकडोहून अधिक प्रवाशी या अघोषित आंदोलनात होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात तणावसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करून संतप्त प्रवाशाना बस आगारात आणले आहे.⭕

anews Banner

Leave A Comment