• Home
  • 🛑 केंद्र सरकार करणार सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्यांचे खासगीकरण; वाचा यादी 🛑

🛑 केंद्र सरकार करणार सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्यांचे खासगीकरण; वाचा यादी 🛑

🛑 केंद्र सरकार करणार सार्वजनिक क्षेत्रातील २६ कंपन्यांचे खासगीकरण; वाचा यादी 🛑

✍️ मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज ).

मुंबई, 8 सप्टेंबर : ⭕ देशाची अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आलेली असताना कोरोनाच्या संकटाने अर्थव्यवस्थेचं पार कंबरडं मोडलं. नुकताच देशाचा आर्थिक विकास दर जाहीर झाला. या दरामुळे देशासमोरील आर्थिक संकट किती गडद आहे हे दिसून येतं. देशाची परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमधून (PSUs) सरकार आपली हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत आहे. याचसंदर्भात २७ जुलै २०२० रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ कंपन्यांचे खासगिकरण करणार असल्याची माहिती दिली होती. या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये हिरवा कंदीलही मिळाला आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सरकार नक्की कोणत्या कंपन्यांमधील हिस्सेदारी विकणार आहे याबद्दलची कोणतीही माहिती दिली नव्हती. दरम्यान, आता सरकार सार्वजनिक क्षेत्रातील २३ नाही तर २६ कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी विकणार असल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. माहिती अधिकारातून कोणत्या कंपन्यांचं खासगीकरण केलं जाणार आहे, याची यादी देखील मिळाली आहे. सर्व २६ कंपन्यांच्या नावाबरोबरच कंपन्यांमध्ये असणारा सरकारी मलकीचा किती हिस्सा विकला जाणार आहे हे कंपनीच्या बाजारमुल्यावर अवलंबून असणार आहे, असंही सरकारने स्पष्ट केलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे.

1) प्रकल्प व विकास इंडिया लिमिटेड (पीडीआयएल)
2) अभियांत्रिकी प्रकल्प भारत लिमिटेड (ईपीआयएल)
3) पवन हंस लिमिटेड (पीएचएल)
4) बी अँड आर कंपनी लिमिटेड (बी अँड आर)
5) एअर इंडिया
6) सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (सीईएल)
7) सिमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड सीसीआयएल (नयागाव युनिट)
8) इंडियन मेडिसिन अँड फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. (आयएमपीसीएल)
9) सालेम स्टील प्लांट, भद्रावती स्टील प्लांट, दुर्गापूर स्टील प्लांट
10) फेरो स्क्रॅप निगम लि. (एफएसएनएल)
11) एनडीएमसीचा नगरनर स्टील प्लांट
12) भारत अर्थ मूवर्स लिमिटेड (बीईएमएल)
13) एचएलएल लाइफकेअर
14) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल)
15) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एससीआय)
16) कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CONCOR)
17) निलाचल इस्पात निगम लिमिटेड (एनआयएनएल)
18) हिंदुस्तान प्रीफेब लिमिटेड (एचपीएल)
19) भारत पंप अँड कंप्रेशर्स लिमिटेड (बीसीपीएल)
20) स्कूटर्स इंडिया लिमिटेड (एसआयएल)
21) हिंदुस्तान न्यूजप्रिंट लिमिटेड (एचएनएल)
22) कर्नाटक अँटीबायोटिक्स आणि फार्मास्युटिकल्स लिमिटेड (केएपीएल)
23) बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स लि. (बीसीपीएल)
24) हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लि. (एचएएल)
25) भारतीय पर्यटन विकास महामंडळ (आयटीडीसी)
26) हिंदुस्तान फ्लोरोकार्बन लिमिटेड (एचएफएल)⭕

anews Banner

Leave A Comment