• Home
  • 🛑 कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा 🛑

🛑 कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा 🛑

🛑 कंगना राणावतला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय सुरक्षा 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕अभिनेत्री कंगना राणावत ही ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. तिच्या येण्यावरून शिवसेनेकडून तसेच अनेक राजकीय पक्षांकडून तिला धमक्या देण्यात आल्या होत्या. त्या लक्षात घेता कंगना राणावत हिला केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश सरकारकडून ही मागणी करण्यात आली होती. ती मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. दरम्यान, यासाठी कंगना हिने गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले आहेत.

अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीवरून कंगना राणावत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. या विषयावर सोशल मीडियावर देखील प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

या वादाला आता राजकीय वळण लागत आहे. या संदर्भात हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले की, ‘राज्य सरकारने कंगना यांना राज्यात सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यांच्या मुंबई दौर्‍यादरम्यान सुरक्षा पुरवण्याबाबतही सरकार विचार करत आहे.’ असे म्हटले होते….⭕

anews Banner

Leave A Comment