• Home
  • 🛑 मुसळधार पावसानंतरही….! मुंबईत पाणी टंचाई निर्माण 🛑

🛑 मुसळधार पावसानंतरही….! मुंबईत पाणी टंचाई निर्माण 🛑

🛑 मुसळधार पावसानंतरही….! मुंबईत पाणी टंचाई निर्माण 🛑
✍️मुंबई 🙁 साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕ मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस बरसत असला तरी मुंबईवरचं पाणीटंचाईचं संकट मात्र कायम राहाणार अशी शक्यता आहे. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा, भातसा आणि वैतरणा या धरणांच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसानं पाठ फिरवलीये. अद्यापही या परिसतात दमदार पाऊस झालेला नाहीये. आजही मुंबईत मुसळधार पाऊ सुरु असताना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र उनपावसाचा खेळ सुरु आहे.

कोरोना प्रादुर्भावाला सामोरं जाणाऱ्या मुंबई आणि उपनगराला काल रात्री पासुनमुसळधार पावसाने झोडपलंय.अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून वाहतुकीची समस्या निर्माण झालीय.

रेल्वे रुळावरही पाणी साचल्याने रेल्वे ठप्प झालीय. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे देखील हाल होतायत. दरम्यान या पार्श्वभुमीवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबई आणि उपनगरात हवामान विभागातने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हे पाहता सर्व शासकीय कार्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे मदत व पुनर्वसन विभागाने यासंदर्भातील माहिती दिलीय.

हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालये आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत. त्यामुळे अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन पालिकेतर्फे नागरिकांना करण्यात येत आहे.

डोंगराचा काही भाग एका समोरच कोसळला असून विजेचा खांबही कोसळला आहे. त्यामुळे संपूर्ण मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने मीरारोडहून मुंबईला येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मात्र, मुंबईहून मीरारोडला जाणारा मार्ग सुरु आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनचालकांना दिलासा मिळाला.

‘या’ वेळी असणार हायटाईड

४ ऑगस्ट १२.०८ सकाळी – ३.९२ मीटर
४ ऑगस्ट १२.४७ संध्याकाळी – ४.४५ मीटर
५ ऑगस्ट १२.४७ सकाळी ३.९८ मीटर
५ ऑगस्ट १.१९ दुपारी ४.४१ मीटर
६ ऑगस्ट १.२३ सकाळी ३.९७ मीटर
६ ऑगस्ट १.५१ दुपारी ४.३३ मीटर

हवामान खात्याने दोन दिवसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. मंगळवार आणि बुधवारी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचं सांगितलं आहे….⭕

anews Banner

Leave A Comment