Home नाशिक पालघर जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबांना न्याय देऊन पूनर्वसन करण्यासाठी सटाण्यात उपोषण सुरू

पालघर जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबांना न्याय देऊन पूनर्वसन करण्यासाठी सटाण्यात उपोषण सुरू

61
0

आशाताई बच्छाव

IMG-20230530-WA0040.jpg

पालघर जिल्ह्याच्या आदिवासी कुटुंबांना न्याय देऊन पूनर्वसन करण्यासाठी सटाण्यात उपोषण सुरू

मनोहर देवरे
युवा मराठा न्युज

पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथील आदिवासी समाजावर जो अन्याय झाला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून न्याय मिळावा व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी आदिवासी पारधी महासंघ चे जिल्हा अध्यक्ष आकाश साळुंके व भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे यांनी सटाणा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व नायब तहसिलदार बी.जे.बहिरम यांच्याकडे केली होती मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे मंगळवार दि.30 रोजी सटाणा तहसील आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला.

दि.१९/४/२०२३ रोजी मौजे-धानिवरी, ता. डहाणू, जि.पालघर येथे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांनी (मुंबई-वडोदरा राजमार्ग) यांच्या आदेशाने,पोलिस
प्रशासने आदिवासी परीवारांवर अमानुष असा अन्याय-अत्याचार करून, त्यांना बेघर करण्यात आले होते. याचे चित्रीकरण पूर्ण भारत देशाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले होते. हे पाहून काळीज अक्षरशः पिळवटून येते. गरीब, अज्ञानी आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आलेला आहे. अजूनही कसतोय परंतु त्याच्या अशिक्षित-अडाणी पणामुळे पणामुळे,त्यांची जमीन त्यांना नावावर करून घेता आली नाही किंवा महसूल प्रशासनानेही स्वतःहून सहकार्याची भावना दाखविली नाही. अशातच त्या जमिनीवरून मुंबई-वडोदरा राजमार्ग जात असल्याने, शेठ, सावकार जागे होवून जाणून बुजून कायद्यावर बोट ठेवून, आदिवासींना त्रास देवू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धानिवरी गावात घर,झाडे यांचा मोबदला न मिळाल्याने व जोपर्यंत आम्हाला मोबदला देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत असा पवित्रा तेथील पीडित स्थानिक आमच्या आदिवासी बांधवांनी घेतल्यामुळे, पोलिस प्रशासनाने जबरदस्तीने वयोवृध्द महिला, शाळकरी मुले यांना खेचत घराबाहेर काढले, तसेच जबरदस्तीने त्यांच्या घरावरील कौले उतरविण्याचा जो भयंकर प्रकार समोर आल्याने, अक्षरशः या देशात लोकशाही आहे की तानाशाही, ठोकशाही आहे हेच समजायला मार्ग राहिला नाही. या घटनेने मानवजातीला काळीमा फासला गेला आहे.आपल्या देशात लोकशाही मृत स्वरुपात आहे की काय? असे क्षणिक वाटू लागले आहे. सदर घटनेचा निषेध करू तितका कमीच आहे.तरी शासन-प्रशासनाने संबंधितांवर कार्यवाही करून, आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती मात्र याकडे डोळे झाक करण्यात येऊन आत्तापर्यंत कार्यवाही किंवा निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे तहसील आवारात आमरण उपोषनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज रोजी त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे

पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबावर धनिवरी येथे अत्याचार झालेला असून अनेक वेळा निवेदन देण्यात आले आहे पण याच्यावर कोणत्याही शासकीय स्तरावर दखल घेण्यात आली नसून त्यामुळे आमरण उपोषणाला बसून याची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून न्याय निवडा व्हावा
राकेश घोडे – निसर्ग व प्राणीमित्र बागलाण तालुका

“पिडीत आदिवासी बांधवांना अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसून त्यांना तात्काळ न्याय मिळुन पुनर्वसन करावे त्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही”
आकाश साळुंके – नाशिक जिल्हाध्यक्ष आदिवासी पारधी महासंघ

Previous articleजयश्री बागुल व राहुल वन्से यांचा सत्कार ;पोलीस दलात झाली निवड
Next articleखेड तालुक्यात  वादळी वारा, गारपीट; पावसाने दाना दान,
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here