Home सामाजिक क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त — वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज...

क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त — वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.

313
0

राजेंद्र पाटील राऊत

क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त — वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास.
छत्रपती संभाजी महाराजांचा आज जन्म पुरंदर किल्ल्यावर झाला.
महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज
आज 14 मे, मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान. देशाला अभिमान वाटावा अशी प्रेरणा देणारा आजचा दिवस होय. 14 मे 1657 रोजी महाराष्ट्र भूमीत अवतरला एक वीर पुरुष, छत्रपती संभाजी महाराज. थोरल्या आबासाहेबांचा, छ शिवाजी महाराजांचा हा छावा. या वीर योध्यास मात्र लाभले आयुष्य फक्त 32 वर्षाचे. फक्त 32. तेही अनेक संकटांनी खचाखच भरलेले. पण त्याने खचून न जाता एकएका संकटाच्या माथ्यावर पाय देऊन शत्रूंना आव्हान देत, त्यांचा थरकाप उडवीत सलग आठ वर्षे हा वीर लढत राहिला. सर्व बाजूनी अनेक शत्रूंनी स्वराज्यावर आक्रमण केलेले तरीही न डगमगता आणि शरणागतीचा चकार शब्द न काढलेला हा राजा लढत राहीला, स्वराज्य रक्षण करीत राहिला. लाखो सैन्य आणि प्रचंड खजिना घेऊन चालून आलेला औरंगजेब बादशहा, मराठ्यांचे राज्य समूळ नष्ट करण्याची प्रतिज्ञा केलेला बादशहा. केवढा मोठा लढा असेल तो कल्पना करा.
पण या लढ्यात शेवटी दुर्दैवाने हा राजा पकडला गेला आणि अत्यन्त हाल हाल करून शेवटी त्या बादशहाने त्याना 11 मार्च 1689 रोजी ठार मारले.
या राजाचा खराखुरा इतिहास देशापुढे येण्याची फार गरज आहे. अनेकांनी त्याना बदनाम करणारे लिखाण केलेले आहे पण अलीकडे संशोधक व लेखकांनी खरा संभाजी राजा कसा होता हे दाखवायला सुरुवात केली आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे.
आज संभाजी महाराजांच्या जयंती निमित्त अनेक संशोधकांनी, लेखकांनी असा निर्धार करावा की या राजाच्या कामगिरीवर लिखाण करून तो त्याना एक मानाचा मुजरा ठरेल.
जयंतीनिमित्त संभाजी महाराजांना मानाचा मुजरा
🖋️ शिवश्री सुनिल शेवाळे संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी शहराध्यक्ष नाशिक 857817280

Previous article. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा   
Next articleपाटील हॉस्पिटल टेंभुर्णी येथे सिटी स्कॅन सेवा सुरु
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here