Home पश्चिम महाराष्ट्र पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी येथे सिटी स्कॅन सेवा सुरु

पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी येथे सिटी स्कॅन सेवा सुरु

201
0

राजेंद्र पाटील राऊत

पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी येथे सिटी स्कॅन सेवा सुरु
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

डॉ. राहूल भारत पाटील यांनी दिली माहिती

टेंभुर्णी येथे कै. डॉ. भारत पाटील यांचा दवाखाना आहे. कै. डॉ. भारत पाटील यांनी माढा तालुका आणि टेंभुर्णीच्या पंचक्रोशीतील अनेक लोकांना वैद्यकीय सेवा पुरवत पहिले हॉस्पिटल स्थापन केले होते. हे सर्वांना माहीतच आहे. त्याबद्दल माढा तालुका व टेंभूर्णी परिसरातील सर्व लोक कै. डॉ. भारत पाटील यांचे नेहमीच ऋणी आहेत. कै. डॉ. भारत पाटील यांच्या सेवेचा वसा घेऊन त्यांचे चिरंजीव डॉ. राहुल भारत पाटील हे यशस्वीपणे हॉस्पिटल चालवत आहे त टेंभूर्णी आणि माढा तालुका परिसरातील रुग्णांची सेवा करत आहेत. आज या हॉस्पिटलमध्ये सिटीस्कॅन मशिन बसवून रुग्णांची खूप मोठी सोय केलेली आहे.सध्या कोरोनाचे पेशंट खूप वाढत आहेत. छातीचा स्कॅन( HRCT) करण्यासाठी इंदापूर अकलूज किंवा इतर ठिकाणी जावे लागत होते. परंतु आता ही सेवा टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटल येथे सुरू होणार आहे. याचा माढा तालुका परिसरातील सर्व नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर पाटील हॉस्पिटल येथे 32 ऑक्सिजन बेड आणि 5 व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था देखील सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे. व अजून 50 ऑक्सिजन’ 15 व्हेंटिलेटर बेड चे काम युद्ध पातळीवर चालू आहे तेही लवकर चालू होतील असे डॉक्टर राहुल भारत पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here