Home पश्चिम महाराष्ट्र . पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा   

. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा   

115
0

राजेंद्र पाटील राऊत

मा. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दाखविला पोलिसांच्या नवीन गाड्यांना हिरवा झेंडा            युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चीफ बीरो प्रतिनिधी महादेव घोलप.

सोलापूर, दि.१४: जिल्हा नियोजन समितीमधून सोलापूर ग्रामीण आणि शहर पोलीस दलासाठी लागणारी वाहने घेण्यात आली आहेत. नियोजन भवन येथे आज त्या गाड्या आणि चावी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पोलीस यंत्रणेला सुपुर्द करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, डॉ. वैशाली कडूकर, प्रभारी मोटार ट्रान्सपोर्ट अधिकारी बालाजी कांबळे, पोलीस निरीक्षक सूरजितसिंह रजपूत आदी उपस्थित होते.

श्री. भरणे म्हणाले, नवीन गाड्यांमुळे पोलीस दलाला सक्षमपणे काम करता येणार आहे. बंदोबस्त, पोलीस स्टेशन यासाठी गाड्यांची त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. त्यांनी झोकून देऊन काम करावे.

ग्रामीण पोलीस दलाला बंदोबस्त, बीट मार्शल, पोलीस स्टेशन, डायल 112 पोलीस सेवा तत्काळ देण्यासाठी नवीन गाड्यांचा उपयोग होणार आहे. जिल्हा नियोजन समितीमधून चार कोटी 46 लाख खर्चून 75 मोटारसायकल, 17 स्कॉर्पियो, प्रत्येकी एक क्रेन, पाण्याचा टॅंकर, बॉम्ब शोधक पथक, इनोव्हा गाड्या ग्रामीण दलासाठी घेण्यात आल्या. शहर पोलीस दलासाठी पेट्रोलिंग, बीट मार्शल यासाठी दोन कोटी 52 लाख खर्चून 27 मोटारसायकल, 15 स्कॉर्पिओ, दोन टाटा योद्धा क्रेन आणि चार कार घेण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here