Home उतर महाराष्ट्र आदर्श महाविद्यालयाचे शेतकरी पुत्र प्रा,डॉ, रविंद्र ठाकरे व सौ,मिनाक्षी ठाकरे यांना “गुरूगौरव”...

आदर्श महाविद्यालयाचे शेतकरी पुत्र प्रा,डॉ, रविंद्र ठाकरे व सौ,मिनाक्षी ठाकरे यांना “गुरूगौरव” पुरस्काराने सन्मानित

114
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220520-WA0008.jpg

आदर्श महाविद्यालयाचे शेतकरी पुत्र प्रा,डॉ, रविंद्र ठाकरे व सौ,मिनाक्षी ठाकरे यांना “गुरूगौरव” पुरस्काराने सन्मानित

वासखेडी – येथील माळमाथा परीसरातील आदर्श शैक्षणिक संकुल निजामपुर -जैताणे या संस्थेचे आदर्श दाम्पत्ये प्रा,डॉ, ठाकरे व आदर्श शिक्षिका सौ,ठाकरे यांना आज रोजी धुळे येथील रीयल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेन्ट गुरूकुल फाऊंडेशन मार्फत 2022 चा राज्यस्तरीय “गुरूगौरव” पुरस्काराने मान्यवरांचे हस्ते सन्मानित करून गौरविण्यात आले, या आदर्श शैक्षणिक संकुलाने परीसरातुन अनेक गरीबांना आधार देत नौकरी ची संधी देखील उपल्बध करून दिली ,त्या आदरणीय बाबासो,शरदचंद्रजी शहा यांनी अनेकांचा संसार अंधारातुन उजेडाकडे नेणारे आदर्श चेअरमन व त्यांचे संचालक मंडळ होय,यासंस्थेने खुपच आदर्श विद्यार्थि घडविलेत जे आज ,आदर्श शिक्षक, प्राध्यापक, प्राध्यापिका, मंत्रालयीन अधिकारी,डॉक्टर,घडविले आहेत,त्यातील एक नाव प्रा,डॉ, ठाकरे दाम्पत्य होय,छोट्याशा वस्तीत राहणारे कै,पोपटराव ठाकरे कुशल शेतकरी रूनमळी यांचे पुत्र व सुन होय ज्या ठाकरेंनी गावातुन पायपीठ करत आदर्श महाविद्यालयात आपले उच्चशिक्षण घेत त्याठिकाणीं आपली सेवा देत एक आदर्श शेतकरी पुत्राचा आदर्श निर्माण केला,त्यांनी २००८ साली वासखेडी गणातुन निवडणुक लढवत दणदणित विजय प्राप्त करत उपसभापती पदी विराजमान होत अनेक योजना घरोघरी पोहचवल्या,अनेक चर्चा सत्रे राबविली,काहीशे लढे देत,संघर्ष करून लाभदायक योजना विकसीत करत शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान बाळगला,त्यांनी सांगितले की या सगळ्यांत माझे आदर्श माझे माता ,पिता,आणि बाबासो,शरदचंद्रजी शाह होत,त्यांच्या या महान कार्यास आदर्श चे सर्वेसर्वा बाबासो,शरदचंद्रजी शहा व संचालक मंडळ, वासखेडी चे शंकरजी एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष दादासो,विठ्ठलराव ठाकरे,संचालक मंडळ,शिक्षक,तसेच रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे धुळे जिल्हाध्यक्ष पत्रकार दिपकभाऊ जाधव. व परीसरातील जि.प.,प़ं‌.सं आजी माझी सदस्य ,ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच, सदस्य,शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छाही दिल्या, प्रा,डॉ, ठाकरे ल सौ,ठाकरे यांनी फाऊंडेशनचे प्रा,डॉ, मनोहर पाटील, प्रा,डॉ,संभाजी पाटील, प्रा,डॉ, मोहन पावरा,राज्य समन्वयक प्रा,डॉ, दिपक पाटील,यांचे शब्दसुमनाने सप्तनिक आभार प्रकट केले

Previous articleआदीवसी अभ्यासक गुणवंत प्रा,डॉ, सुधाकर जाधव व वासखेडी जि.प.मुख्याध्यापिका सौ,संगिता पाटील या दाम्पत्यांस “गुणगौरव” पुरस्काराचा सन्मान
Next articleमोटारसायकल अपघातात एक ठार 2 गंभीर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here