Home बुलढाणा मोटारसायकल अपघातात एक ठार 2 गंभीर

मोटारसायकल अपघातात एक ठार 2 गंभीर

41
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220522-WA0013.jpg

मोटारसायकल अपघातात एक ठार 2 गंभीर

संग्रामपूर,(रविंद्र शिरस्कार शहरप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
तालुक्यातील सोनाळा येथील मंगेश सरदार व संग्रामपूर येथील महादेव गायगोळ यांच्या मोटारसायकलची अमोरासमोर धडक झाल्याने महादेव गायगोळ यांचा मृत्यू झाला असून मंगेश सरदार हे गंभीर जखमी झाले व त्यांची 9 वर्षीय मुलगी समीक्षा हिचा पाय फॅक्चर झाला आहे.
संग्रामपूर येथील महादेव गायगोळ हे आपल्या दुचाकी क्र. एम एच 28 बी जे 45 97 ने वरवट बकाल कडे जात होते तर मंगेश सरदार हे सोनाळा येथून चांगेफळ येथे जात असताना वरवट बकाल ते संग्रामपूर रस्त्यावरील सातपुडा महाविद्यालयाजवळ दोन्ही मोटारसायकलची अमोरासमोर अपघात झाला त्या अपघातातील तिन्ही जखमींना प्रथम ग्रामिण रुग्णालय वरवट बकाल ला आणले असता महादेव गायगोळ वय 42 वर्षे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने व रक्तस्त्राव झाल्याने यांना शेगाव रेफर केले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. तर मंगेश सरदार वय 40 वर्ष
रा. साेनाळा हे गंभीर जखमी झाले असून त्यांची मुलगी समीक्षा वय 9 वर्ष हिचा पाय फॅक्चर झाला असल्याने त्यांना पण शेगाव येथे रेफर केले.

Previous articleआदर्श महाविद्यालयाचे शेतकरी पुत्र प्रा,डॉ, रविंद्र ठाकरे व सौ,मिनाक्षी ठाकरे यांना “गुरूगौरव” पुरस्काराने सन्मानित
Next articleबालविवाह रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी करणार : सातपुते
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here