Home Breaking News वणी बस दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची मदत व नातेवाईकांना संपर्कासाठी मदत संपर्क कक्ष नातेवाईकांनी...

वणी बस दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची मदत व नातेवाईकांना संपर्कासाठी मदत संपर्क कक्ष नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

258
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230712-WA0069.jpg

वणी बस दुर्घटनाग्रस्त प्रवाशांची मदत व नातेवाईकांना संपर्कासाठी मदत संपर्क कक्ष

नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये जिल्हा प्रशासनाचे आवाहन

जळगाव, नरेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क– नाशिक सप्तशृंगी गडावरील घाटात झालेल्या एसटी बस अपघातात जखमी प्रवाश्यांची मदत व नातेवाईकांना विचारपूस करण्यासाठी अमळनेर तहसील कार्यालयात मदत संपर्क कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये. या कक्षाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

या अपघातात अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. जखमींवर नाशिक जिल्हा रूग्णालय व वणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. सप्तशृंग गड ते खामगांव ह्या बसचा आज, दि.१२ जुलै रोजी सकाळी सप्तशृंग घाटातील गणेश घाट, नांदुरी येथे ६.५० वाजता अपघात झाला. या अपघातात आशाबाई राजेंद्र पाटील (वय-55 रा.मुडी. ता.अमळनेर जि.जळगांव) यांचा मुत्यु झाला आहे‌.

यात जखमी मध्ये सर्व रा .मुडी. ता.अमळनेर, जि.जळगांव येथील आहेत‌. यात  प्रमिलाबाई गुलाबराव बडगुजर वय.65 , संजय बळीराम भोईर, वय-60, सुशिलाबाई सोनु बडगुजर वय -67, वत्सलाबाई साहेबराव पाटील वय-65, सुशिलाबाई बबन नजान वय-65, विमलबाई  भोई वय-59, प्रतिभा संजय भोई वय-45, जिजाबाई साहेबराव पाटील वय 65, संगिता बाबुलाल भोई वय-५६ रत्नाबाई (आडनाव सांगितले नाही) सुरेखाबाई हिरालाल बडगुजर वय-53, भागीबाई माधवराव पाटील वय-५२, संगिता मंगिलाल भोई वय-56 तसेच भोकर,ता‌.जि.जळगाव येथील रघुनाथ बळीराम पाटील वय-70, बाळू भावलाल पाटील वय-48 यांचा समावेश आहे.

जखमींवर प्रवाशांच्या मदतीसाठी अमळनेर येथे स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात संदीप पाटील – 9834236436 यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन अमळनेर तहसीलदार रूपेश सुराणा यांनी केले आहे.

दरम्यान, मृत्यूमुखी पडलेल्या महिलेच्या वारसाला दहा लाख रूपये शासकीय मदत घोषित करण्यात आली आहे. या अपघातातील जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले असल्याचे मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क कक्षाने प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातस्थळी यांनी भेट दिली असून मंत्री अनिल पाटील हेही अपघातग्रस्तांची नाशिक येथे भेट घेणार आहेत.

Previous articleएक रुपयात पिक विमा योजनेबाबत शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार,
Next articleतलाठी रातोळीकर यांना निरोप व पदाजी यांचे स्वागत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here