Home जालना महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा

महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा

28
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_064849.jpg

महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये असलेल्या
आरोग्य मित्रांना 25 हजारांची वेतनवाढ करा
जिल्हाधिकारी यांच्याकडे आरोग्यमित्रांची मागणी
जालना (दिलीप बोंडे) ः महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत (एमजेपीजेएवाय) सेवेत असलेल्या आरोग्य मित्रांना 25,000 रुपये वेतनवाढ देण्यात यावी, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यासाठी आरोग्य मित्रांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देत मागणी केली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना येथील सर्व आरोग्यमीत्र सन 2012 पासून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये कार्यरत आहेत. ए. एम. डी. इंडिया इन्शुरन्स कंपनी तृतीय पक्षामार्फत या आरोग्य मीत्रांची नेमनुक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे हे आरोग्यमित्र कोरोणाच्या महामारीतही आपल्या जीवाची पर्वा न करता आणि कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. 2018 पासुन प्रधानमंत्री जण आरोग्य योजना (आयुष्यमान भारत) व महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचे एकत्रित इ-केवायसीचे कामे सुद्धा हे आरोग्यमित्र करत आहेत. त्याचाही मोबदला त्यांना अजुनपर्यंत मिळाला नसल्याने तो  मोबदला तात्काळ देण्यात यावा तसेच प्रति महा किमान  25 हजार रुपये वेतनवाढ देण्यात यावी असेही या निवेदनात म्हटले आहे. तसेच या योजनेचे रुग्ण व रुग्णालय यांना  कुठल्याही प्रकारची उपचारादरम्यान अडचण येणार नाही. याची आरोग्यमित्र खात्री देत असल्याचे देखील त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.  सदरच्या मागण्या तात्काळ मंजुर करण्यात याव्या अशी देखील ओरड आरोग्यमित्रांकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर सर्वच आरोग्यमित्रांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Previous articleमेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल
Next articleराष्ट्रीय क्रीडा सप्ताहास उत्साहात सुरूवात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here