• Home
  • आरती बोराडे लिखित’बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा व पोस्टर उद्घाटन संपन्न

आरती बोराडे लिखित’बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा व पोस्टर उद्घाटन संपन्न

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210108-WA0029.jpg

आरती बोराडे लिखित’बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा व पोस्टर उद्घाटन संपन्न✍️(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)। भारतीय क्रीडा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय क्रिडा विकास आणि पदोन्नती महासंघाचे अध्यक्ष , राष्ट्रीय युवा प्रेरणास्रोत ( क्रिडा क्षेत्र ) , राष्ट्रीय विक्रम विजेत , विविध राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार विजेते श्री.निलेश राणे सर यांच्या हस्ते आरती बोराडे लिखित आणि तृप्ती पाटील , चारूलता चांदवडकर निर्मीत बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. बॉबीन लघुपटाच्या पोस्टर तसेच टायटल कार्डचेही याप्रसंगी श्री निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले !

याप्रसंगी निलेश(दादा) राणे युवा प्रतिष्ठानचे नाशिक जिल्हाध्यक्ष भुषण अहिरे व शहराध्यक्ष भुषण बोरोले , चाईल्ड आर्टिस्ट तरूण गाढे, दिग्दर्शक आरती बोराडे , निर्मात्या तृप्ती पाटील आदी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी कला माध्यमाचा उत्तमपणे उपयोग करून घेता येईल यासाठी ‘सावित्रीउत्सवाचा’ मुहूर्त साधत मी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करित असल्याचे , याप्रसंगी बॉबीनच्या कथा, संवाद लेखक तसेच दिग्दर्शक आरती बोराडे यांनी सांगितले.

महिलांनी महिलांसाठीचे विषय हाताळत नाशिकमध्ये महिला निर्माता तसेच महिला दिग्दर्शक म्हणून नव्याने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या बॉबीनच्या टिमला श्री.निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

anews Banner

Leave A Comment