Home गुन्हेगारी विराज कंपनीत गळफास घेतलेल्या अवस्थेतील कामगाराचा सडत चालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

विराज कंपनीत गळफास घेतलेल्या अवस्थेतील कामगाराचा सडत चालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

135
0

राजेंद्र पाटील राऊत

विराज कंपनीत गळफास घेतलेल्या अवस्थेतील कामगाराचा सडत चालेला मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ

हत्या की आत्महत्या याबाबत साशंकता”

(वैभव पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
तारापूर: दि. ८, तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. विराज प्रोफाइल लि. प्लॉट नं. 75, 76 व 77 या कंपनीत काल दुपारी कंपनीच्या छताला गळफास घेतलेल्या अवस्थेतील सडत चाललेल्या स्थितीतला कामगार लालसिंग बहुरा वय 45, याचा मृतदेह आढळल्याने कामगारांमध्ये व परिसरातील लोकांमध्ये खळबळ उडाली आहे. लालसिंग बहुरा हा विराज कंपनीमध्ये मागील बारा वर्षापासून प्लंबरचे काम करत होता. सहा महिन्यापूर्वी त्याला कंपनी रोल वरून कमी करून साईनाथ इंटरप्राईजेस या महेश महतो याच्या ठेकेदारी मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धती वरती कामावर ठेवण्यात आले होते. दि. 29/12/ 2020 रोजी नेहमीप्रमाणे तो कंपनीत कामावरती गेला होता. परंतु त्या रात्री तो घरी परतला नाही. याबाबत त्याच्या घरच्यांनी दि. 30/12/2020 रोजी कंपनीमध्ये चौकशी केली असता गेटवरील वाचमननी तो त्याच दुपारीच घरी निघून गेल्याचे सांगितले. परंतु तो घरी गेलेला नसल्याने कंपनीचे एच आर ऑफिसर नीरज पांडे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी तो त्याच दिवशी रात्री 8 वाजून 8 मिनिटांनी कार्ड आउट (पंचिंग) करून कंपनीतून बाहेर गेला असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या घरच्यांनी दि. 1 जानेवारी रोजी बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात त्याची मिसिंग तक्रार नोंदवली होती. दरम्यान काल दुपारी कंपनीच्या छताला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत त्याचा सडत चाललेला मृतदेह आढळल्याने कामगारांमध्ये व परिसरातील लोकांमध्ये एकच खळबळ उडून उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. ठेकेदार महेश महतो हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने व कंपनीचा पूर्वइतिहास पाहता मयत कामगार लालसिंग बहुरा याच्या परिवाराने ही आत्महत्या नसून हत्या असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले आहे. याबाबत बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद घेऊन पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेनेचे प्रभाकर राहुल यांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत कामगाराच्या परिवारास योग्य ती नुकसान भरपाई व त्याचा थकीत हिशोब देण्याबाबत कंपनीकडून लिखित आश्वासन मयत कामगाराच्या परिवारास दिले असून शिवसेना पीडित कामगारांच्या परिवारासोबत असल्याचे सांगितले आहे. कंपनीने या कामगारास मागील सहा महिन्यापूर्वी कामावरून कमी केले असतानाही अद्याप त्यास कोणता ही हिशोब दिलेला नव्हता, असे असतानाही पुन्हा या कामगारास महेश महतो याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कामावरती ठेवण्या मागचे व त्याच्या मृत्यू मागचे गुड काय आहे. याचा तपास होणे आवश्यक आहे. दरम्यान मागील चार दिवसापासून ठेकेदार महेश महतो हा अचानक गावी निघून गेल्याचे सांगण्यात येत असल्याने या कामगारांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली जात आहे.(व्हिडीओ न्युज बघा सायंकाळी )

Previous articleआरती बोराडे लिखित’बॉबीन या लघुपटाची अधिकृत घोषणा व पोस्टर उद्घाटन संपन्न
Next articleकळवाडी गावात प्रशासनाच्या दक्षतेमुळे तणाव होता -होता टळला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here