Home नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे ॲकॅडमी सीबीएससी पॅटर्न स्कूलचा वार्षिक...

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे ॲकॅडमी सीबीएससी पॅटर्न स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

30
0

आशाताई बच्छाव

IMG-20230206-WA0037.jpg

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे ॲकॅडमी सीबीएससी पॅटर्न स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न

भास्कर देवरे (उपसंपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे होरायझन ॲकॅडमी (सीबीएससी पॅटर्न) या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मंगळवार दि.31 जानेवारी २०२३ रोजी शाळेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवर अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आली. आपल्या प्रास्ताविकाच्या भाषणात होरायझन अकॅडमी शाळेच्या प्रिन्सिपल श्रीमती श्रुती देशमुख मॅडम यांनी 4 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आपल्या सर्वांसाठी मौल्यवान आणि अविस्मरणीय दिवस असल्याचे नमूद केले. या वार्षिक स्नेहसंमेलनाची थीम गौरव महाराष्ट्राचा म्हणून अभिमानास्पद असल्याचे बोलून दाखवले. असे संमेलन, गॅदरिंग ही विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आम्हा सगळ्यांना कठोर परिश्रम करण्यासाठी अभिमानाची प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात. होरायझन अकॅडमी एक उत्तम दर्जाचे शिक्षण देणारी शिक्षण संस्था असून शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी सगळ्यांच्या परिश्रमाबद्दल आणि त्यासाठी व्यवस्थापनाकडून सतत सहकार्य मिळत असल्याचे आभार मानले. तसेच शाळेत असलेल्या सोयी सुविधाबद्दल माहिती देतानाच आणि पालकांची असलेला सुसंवाद हा किती महत्वपूर्ण आहे याबद्दल त्यांनी मत व्यक्त केले. तसेच शाळेत विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे घेऊन कौतुक केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे सर यांनी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनती बद्दल आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या परफॉर्मन्स बद्दल पूर्ण टीमचं कौतुक केले. शाळेने निवडलेले थीम बद्दल आपल्याला गौरव वाटला पाहिजे कारण हेरिटेज महाराष्ट्र
आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे सर यांनी कोविडच्या परिस्थितीमुळे गेल्या चार वर्षापासून कुठलेही कार्यक्रम करता येत नसल्याची खंत व्यक्त केली, परंतु यावर्षी होरायझन अकॅडमी (cbse pattern) या शाळेने आपल्या विद्यार्थ्यांनी मराठी कल्चर विसरू नये याच्यासाठी गौरव महाराष्ट्राचा ही थीम निवडल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक केले. “गौरव महाराष्ट्र आपल्याला गर्व वाटला पाहिजे, आपल्या संस्कृतीबद्दल इंग्लिश मीडियम शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांनी पण आपली संस्कृती विसरू नये असे मराठी कल्चरचे परफॉर्मन्स शाळेने दाखवले म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुक आणि अभिनंदन या प्रयत्नांबद्दल करत आहे. विद्यार्थ्यांचे सर्वस्तरावर डेव्हलपमेंट फार महत्त्वाची असते आणि होरायझन स्कूल हे खूप चांगल्या पद्धतीने हे काम करत आहे म्हणून पुन्हा एकदा शिक्षकांचे कौतुक करतो” अशा शब्दात कौतुक केले.
यावर्षीच्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे एक इंग्रजी माध्यमाची शाळा असून संपूर्णपणे महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याचा प्रयत्न केला “गौरव महाराष्ट्र” या नावाने हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये भारुड, योगा, भावगीत, कोळी डान्स, गोंधळ – जागरण, जोगवा, मल्हारी, ज्योतिबा, वासुदेव, धनगर, बाल्या डान्स, पोतराज, मल्हारी, कॉमेडी, लोकगीत, शेतकरी गीत, निसर्ग गीत, ठाकर डान्स अशा विविध रंगी महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या छटा दर्शवणारे गीत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तमरीत्या सादर केले. शिवाजी महाराज यांची थीम, प्रदूषण मुक्ती, ऑक्सिजन वाचवा, आणि मिशन पाणी हा पाण्याचे महत्व आणि भविष्यातील दाहकता यावर प्रकाश टाकणारा परफॉर्मन्स हे या संमेलनातील काही वैशिष्ट्यपूर्ण डान्स सादर केले गेले. अशा वैविध्यपूर्ण कला विद्यार्थ्यांनी सादर करून आपल्या गुणांचं प्रदर्शन केले आणि उपस्थितांची फक्त मनच नाही जिंकले तर भरभरून दाद मिळवली.
याप्रसंगी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक या संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे सर, संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब शिरसागर, उपसभापती देवराम मोगल सर, विश्वासराव मोरे, ॲड. संदीप गुळवे, ॲड. लक्ष्मण लांडगे, श्री. रमेश पिंगळे, श्री. प्रवीण जाधव नाना, श्री संजय पाटील, चुंबळे मॅडम, ॲड. जगदीश सर, डॉ. अजित मोरे, श्री. रमेश कडलक, श्री. प्रमोद सरवर, श्री. रामदास लांडगे, श्री. हांडगे सर, श्री. संदीप थेटे सर, श्री. कोकाटे सर तसेच संस्थेचे शिक्षणाधिकारी श्री. सी.डी. शिंदे सर, होरायझन ॲकॅडमी ICSE Scetion) च्या प्रिन्सिपल मॅडम, उदोजी होरायझनच्या प्रिन्सिपल मॅडम नेहा सोनवणे, उदोजी अर्लीअर्सच्या प्रिन्सिपल मॅडम दीप्ती पटेल आणि विविध, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि पालक गण उपस्थित होते.
याप्रसंगी काही पालकांनीही व्यासपीठावरून जाहीर मनोगत व्यक्त करताना शाळेच्या उंचावणारा आलेखाबद्दल समाधान व्यक्त करत शिक्षकांचे आभार मानले. तसेच युवा मराठा न्यूज नेटवर्क चे उपसंपादक श्री. भास्कर देवरे सर यांनी व्यासपीठावरून आपलं मनोगत व्यक्त करताना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संपूर्णपणे मराठी संस्कृती दाखवल्याबद्दल आणि सर्व विद्यार्थ्यांचे कार्यक्रम डान्स, सॉंग्स हे सर्व शिक्षकांनी वैयक्तिक मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्याबद्दल शिक्षकांचे अभिनंदन करून आणि शाळेचे आभार मानले.
कार्यक्रम स्थळी पालकांच्या आणि विध्यार्थ्यांच्या अडचण येवू नये यासाठी कलाशिक्षक श्री. प्रवीण सर आणि त्यांच्या सोबत असलेले सर, मॅडम यांनी चांगले सहकार्य केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रिन्सिपल श्रीमती श्रुती देशमुख मॅडम, शाळेचा संपूर्ण शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी होरायझन ॲकॅडमी शाळेच्या प्रिन्सिपल श्रीमती श्रुती देशमुख मॅडम यांनी आभार व्यक्त केले.

Previous articleराजकीय हस्तक्षेपामुळे परीक्षा लांबणीवर
Next articleसाक्री तालुक्याच्या विकासरत्न आमदार सौ,मंजुळा गावित यांच्याहस्ते मौजे आमोडे व परीसरात विविध योजनांचे भुमिपुजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here